Jump to content

गालिया लुग्डुनेन्सिस

रोमन साम्राज्याचा गालिया लुग्डुनेन्सिस प्रांत

गालिया लुग्डुनेन्सिस (लॅटिन: Gallia Lugdunensis, फ्रेंच: Gaule Lyonnaise) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. इ.स.पू. ५८ ते ५० या काळात ज्युलियस सीझरने गॉलच्या टोळ्यांचा पराभव केल्यावर हा प्रांत इ.स.पू. २७ ते २५ च्या दरम्यान किंवा इ.स.पू १६ ते १३ च्या दरम्यान स्थापन झाला. या प्रांताचे नामकरण त्याची राजधानी लुग्डुनम (आजचे ल्यों) वरून करण्यात आले होते.