गार्गी बॅनर्जी
गार्गी बॅनर्जी (२० जुलै, १९६३:कलकत्ता, पश्चिम बंगाल - ) ही भारतकडून कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलेली माजी क्रिकेट खेळाडू आहे.[१] ईडन गार्डन येथे झालेल्या भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सामन्यात तिने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यावेळी तिचे वय १४ वर्षे होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यापूर्वी ती पश्चिम बंगालकडून देशांतर्गत लीगमध्ये खेळली होती. वायडब्ल्यूसीए (यंग वूमन ख्रिश्चन असोसिएशन) येथे ती क्रीडा, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळत असे.
संदर्भ
- ^ "Gargi Banerji". Cricinfo. 2019-09-30 रोजी पाहिले.
{{DEFAULTSORT:बॅनर्जी, गार्गी}