Jump to content

गार्गी

गार्गी या नावाने विख्यात असलेली गार्गी वाचक्नवी ही प्राचीन भारतातील एक तत्त्वज्ञ होती. बृहदारण्यक उपनिषदाच्या सहाव्या आणि आठव्या ब्राह्मणात विदेहाचा राजा जनक याने आयोजिलेल्या ब्रह्मसभेच्या वर्णनात तिचा उल्लेख आढळतो. आत्म्यावरील काही दर्जेदार प्रश्न तिने याज्ञवल्क्याला विचारले आणि त्याला आव्हान दिले.

गर्ग कुळात उत्पन्न झालेली म्हणून गार्गी; तर वचक्नु या पित्याच्या नावावरून गार्गी वाचक्नवी हे संयुक्त नाव आले.

समग्र अस्तित्वाच्या उत्पत्तीबद्दल गार्गीने अनेक स्तोत्रे रचली. योग याज्ञवल्क्य या योगमार्गावरील ग्रंथात गार्गी आणि याज्ञवल्क्य ऋषी यांचा संवाद आहे. मिथिलेचा राजा जनक याच्या दरबारातील नवरत्नांपैकी गार्गी एक होती.प्राचीन काळातील बुद्धीमान स्त्री.

संदर्भ व नोंदी