Jump to content

गाब्रिएला मिस्त्राल

गाब्रिएला मिस्त्राल
जन्म ७ एप्रिल १८८९ (1889-04-07)
व्हिकुन्या, चिली
मृत्यू १० जानेवारी, १९५७ (वय ६७)
हेम्पस्टीड, न्यू यॉर्क, अमेरिका
राष्ट्रीयत्व चिलीयन
कार्यक्षेत्र कवयित्री
भाषास्पॅनिश
पुरस्कार नोबेल पुरस्कार
स्वाक्षरीगाब्रिएला मिस्त्राल ह्यांची स्वाक्षरी

गाब्रिएला मिस्त्राल (Gabriela Mistral) हे ल्युसिला गोदोय अल्कायागा (स्पॅनिश: Lucila Godoy Alcayaga; ७ एप्रिल, १८८९:व्हिकुन्या, चिले - १० जानेवारी, १९५७:हेम्पस्टेड, न्यू यॉर्क, अमेरिका) या चिलेच्या शिक्षिका, कवयित्री व मुत्सदीचे टोपणनाव होते. मिस्त्रालला १९४५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच लॅटिन अमेरिकन व्यक्ती व आजवरची एकमेव लॅटिन अमेरिकन महिला आहे.

जगभर शिक्षणाचा व महिला हक्कांचा प्रसार करणाऱ्या मिस्त्रालने अनेक देशांमध्ये निवास केला व भेटी दिल्या. प्रसिद्ध चिलीयन कवी पाब्लो नेरुदा हा मिस्त्रालचा विद्यार्थी होता.

बाह्य दुवे

मागील
योहानेस विल्हेल्म येन्सन
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९४५
पुढील
हेर्मान हेस