Jump to content

गाजर गवत

मे‍‍‍‍क्सिको,अमेरिका हे गाजर गवताचे उगमस्थान आहे. आपल्या देशात १९५५ मध्ये प्रथम पुणे येथे हे गवत निदर्शनास आले. अशी माहिती अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही एम. भाले यांनी दिली. राज्यात १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत आयात झालेल्या मिलो ज्वारी, गव्हाच्या माध्यमातून गाजर गवताचे बी आपल्याकडे आले. हवेच्या प्रवाहासह ते सर्वत्र पसरले आणि गाजर गवत पक्के ठाण मांडून बसले.

हे गाजर गवत, आम्लयुक्त, अर्कयुक्त जमिनीवर कमी पाऊस पडला तरीही उगवते. पिकाची नासाडी, ॲलर्जी, चर्मरोग, श्वसनाचे आजार उद्भवतात. त्यामुळे हे गवत उपद्रवी आहे मानले जाते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

आपल्याकडे गाजर गवत इतके फोफावत आहे. त्यामुळे त्याचा झटपट नायनाट होणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने सामूहिकरित्या मोहिम, उपक्रम घेण्यात आले तर ते शक्य आहे.

गाजर गवताचे निर्मूलन करणे अत्यावश्यक असून. जैविक नियंत्रण पद्धतीनुसार मेस्किकेन भुंग्याद्वारे या गवतांवर नियंत्रण ठेवता येते. कारण विद्यापीठात करण्यात आली आणि त्याचे परिणामही अनुकूल दिसून आले.

या गवताच्या नायनाटासाठी तणनाशके महागडी असल्याने परवडत नाही. गवत विषारी असल्यामुळे मजूर काम करत नाहीत त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी संशोधन सूरु झाले. या गवतावर २२ प्रकारच्या कीडी तात्पुरत्या स्वरूपात आढळतात. १९८३ मध्ये मेक्सीको भुंगा हा उत्तम प्रकारे नियंत्रक करु शकतो ही बाब संशोधनातून समोर आली. परभणी येथे कृषी विद्यापीठात या भुंग्याचे प्रजनन करण्यात येते.

नव्या जागेत हे भुंगे सोडण्याची प्रक्रिया, शेतात प्रती हेक्टरी ५०० भुंगे सोडले पाहिजेत. हे भुंगे एका सच्छिद्र पॉलीथीन पिशवीतून आणून सोडावेत. प्रती भुंगा एक रुपया अशी त्याची किंमत आहे.

याशिवाय १०० लिटर पाण्यात २० किलो जाडे मिठ घालून केलेले द्रावण गाजर गवतावर फवारावे तसेच तरोटा ही वनस्पती सुद्धा गाजर गवताला नियंत्रित करु शकते त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात तरोट्याच्या बिया गोळा कराव्यात आणि या बियाची एप्रिल, मे महिन्यात गाजर गवताच्या पसिरात धूळफेक करावी.

गाजर गवत निर्मूलनासाठी, नागरिक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या सहकार्याने संबंधित यंत्रणांनी मोहिम हाती घेणे गरजेचे आहे.

[]

संदर्भ