गांधी जयंती
गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो.[१] गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे.[२]
महत्त्व
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.[३] भारतीय जनमानसावर महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा प्रभाव आहे. भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो.[४] त्यामुळे त्यांची जयंती भारतात साजरी केली जाते.
स्वरूप
गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधीयांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यांची आठवण करणे यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शाळा- महाविद्यालये येथे स्पर्धाचे आयोजन करणे, पदयात्रा, व्याख्याने यांचे आयोजन, मान्यवर वक्त्यांची आणि अभ्यासक यांची भाषणे आयोजित करणे अशा उपक्रमांची योजना केली जाते.[५] महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर त्यांना फुले वाहून त्यांचे स्मरण केले जाते.
हे सुद्धा पहा
- महात्मा गांधी
- जयंत्या
संदर्भ
- ^ "Gandhi Jayanti 2020: The history, importance and significance". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-10-02. 2020-10-03 रोजी पाहिले.
- ^ Hindi, UN News (2019-10-02). "अहिंसा दिवस पर महात्मा गाँधी के शांति संदेश की गूंज". संयुक्त राष्ट्र समाचार (हिंदी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "Mahatma Gandhi Jayanti in India". www.timeanddate.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-03 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat (2020-10-02). "Gandhi Jayanti 2020 : महात्मा गांधीजींचे १० प्रेरणादायी विचार". Lokmat. 2020-10-03 रोजी पाहिले.
- ^ "Gandhi Jayanti, October 02: Sample speech for students - Times of India". The Times of India. 2020-10-03 रोजी पाहिले.