Jump to content

गहंबार सण

हा एक पारशी धर्मातील ऋतुमानावर आधारित सणांची शृंखला आहे. हे सण दर दोन महिन्यांनी येत असतात. हे सण पारशी धर्मात पाच दिवस साजरे केले जातात.पारशी धर्माचे एकमेव दैवत अहुर मजदा यांनी सृष्टी निर्माण केल्याबद्दल त्यांचे आभार या सणामध्ये मानले जातात. गहंबार सणाच्या शृंखलेतील शेवटचा सण १० मार्च ते २० मार्च या कालावधीत असतो . या काळात स्वर्गातील पितर पृथ्वीवर आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येतात.अशी पारशी धर्मीयांची श्रद्धा आहे.