लंडन हीथ्रो विमानतळाहून निघालेले गल्फ एरचे एरबस ए३४० विमान
गल्फ एर (अरबी: طيران الخليج) ही बहरैन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५० साली स्थापन झालेल्या गल्फ एरचे मुख्यालय मुहर्रक येथे असून तिच्या ताफ्यामध्ये २८ विमाने आहेत. सध्या गल्फ एरमार्फत जगातील २३ देशांतील ४२ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.