गर्भावस्था
सस्तनी किंवा जरायुज पृष्ठवंशधारी प्राण्यांमधील गर्भधारणा ते जन्म या दरम्यानची अवस्था म्हणजे गर्भ होय.
दृश्यता
नऊ आठवड्यापासून शिशाचा जन्म होईपर्यंतची अवस्था म्हणजे गर्भावस्था होय. भ्रूणावस्थेत जे अवयव तयार झालेले असतात त्यानंतरची वाढ व विकास या अवस्थेत होतो.
तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ९ सेमी व वजन ३०ग्राम होते. चेहरा, डोळे, कान, स्नायू यांच्या वाढीस सुरुवात होते. मुलींमध्ये प्रजनन संस्थेच्या वाढीस सुरुवात होते. चौथ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी १६सेमी व वजन १०० ग्राम होते. डोक्याचा आकार बराच वाढतो. केस, नखे तयार होऊ लागतात. पापण्यांची उघडझाप होते. केस येतात. नाक व वार ही बरीच विकास पावते. पाचव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे २५सेमी व वजन सुमारे ३०० ग्राम असते. स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ह्रदयाचे ठोके ऐकू येतात. मातेला गर्भाची हालचाल जाणवते. सहाव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३०सेमी व वजन ६८०ग्राम असते. डोळ्याची पूर्ण वाढ होते. डोळे उघडे दिसतात. पापण्यांची केस, भुवया तसेच जिभेमध्ये टेस्ट बड्स तयार होतात. गर्भ श्वासोच्छ्वास करू शकतो. या दरम्यान जन्म झाला तर रडण्याचा आवाज बारीक येतो व जगण्याची शक्यता कमी असते. कारण श्वसन संस्था परिपक्व झालेली नसते सर्व अवयवांची निर्मीती झालेली असते. गर्भाची हालचाल वाढते. सातव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३५सेमी व वजन ११००ग्राम होते. त्वचेवर सुरकुत्या दिसतात. कवटीचे हाडे मऊ असतात. जन्म झाला तर शिशु जगू शकतो;परंतु विशेष प्रयत्न करावे लागतात. तापमानास प्रतिसाद देतो. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात.
आठव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ४० ते ५० सेमी व वजन २५००ग्राॅम होते. सबंध शरीरावर स्निग्ध पदार्थ तयार होते. त्यामुळे गर्भाशया बाहेरच्या बदललेल्या तापमानास समायोजन करू शकते. सर्व अंगाची निर्मिती झालेली असते.
नवव्या महिन्याच्या शेवटी