Jump to content

गर्भ पुष्टी लक्षण - बृहत् संहिता

[]

।। श्री ।।

बृहत् संहिता

गर्भ पुष्टी लक्षणः –

वराह मिहिर यांनी बृहत संहितत मेघगर्भ लक्षण या अध्यायात मेघगर्भ धारणा, शुभ गर्भसंभव, अशुभ गर्भ धारणा गर्भमोक्ष इत्यादी बाबत सविस्तर सांगितले आहे. आपला भारत देश कृषि प्रधान असल्याने शेती व अन्नधान्याचा उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टिने पावसाचा अंदाज आधीच लावता येण्यासाठी ही मेघगर्भ लक्षणे पाहून आगामी वर्षाऋतुत वर्षा कशी होईल हे भाकीत करण्यासाठी हा अध्याय उपयुक्त आहे.

आचार्य वराह मिहिर यांच्या मताप्रमाणे मार्गशीर्ष शुक्लपक्षात पूर्वाषाढा नक्षत्रात चंद्र जेव्हा जाईल तेव्हा मेघधर्म लक्षणाची सुरुवात समजावि.

गर्भपुष्टी दायक असता (गर्भलक्षणावरून) १९५ दिवसांनी ज्या नक्षत्रात चंद्र असता गर्भधारणा संभव आहे त्या नक्षत्रापासुन १९५ दिवसांनी पुन्हा चंद्र त्याच नश्रत्रात जाईल तर खूप पाऊस पडतो. ही गणना सावनमानाने घ्यायची आहे चंद्रतिथीनुसार नाही.

मेघगर्भपुष्ठी दायक आहे हे समजण्यासाठी खालील लक्षणे आवश्यक आहेत जेव्हा गर्भधारणा होईल त्यावेळी.

१. गर्भधारणेच्यावेळी मध्यम व कोमल गतिने हळुवार हवा वाहेल, जी शरीराला प्रसन्नता देईल. व ती प्रदक्षिणा क्रमाने उतरेकडुन → ईशान्य → पूर्व → दक्षिण याप्रमाणे वाहेल तर.
२. आभाळ स्वच्छ निरभ्र असेल तर.
३. सूर्यचंद्र यांची चमक अधिक असेल, सूर्य-चंद्राच्या भोवती ढंगाचे वेरोळे जमा झाले तर हया सर्व लक्षणावरून मेघगर्भ धारणेची सूचना मिळते.
४. मेघगर्भधारणा समयी मेघ विशाल व घने होतात.
५. सुईप्रमाणे टोकदार, खुरपे, वस्तारे/फावडयाच्या आकाराचे ढग बनतात.
६. चंद्र तारे खूप चमकतात.
७. संध्याकालात इंद्रधनुष्य दिसते.
८. मधूर मेघगर्जना, वीज चमकणे, प्रतिसुर्य दिसणे ही सर्व मेघगर्भ धारण लक्षणे आहेत.
९. पशु पक्षी उतर/ईशान्य/पूर्वेकडे तोंड करून उभे रहातात. किंवा पळु लागतात. पशु पक्षांचा आवाज मंजुळ असतो. पण ते सूर्यबिंबाकडे पहात नाहीत.
१०. ग्रहांचे बिंब आकाराने मोठे, नक्षत्रामध्ये उत्तरेकडून गमन करणारे, किरणे कोमल, उत्पात रहित असतात.
११. झाडे झुडपे यांमध्ये अंकुरण होते.
१२. पशु प्राणी तसेच मनुष्य प्रसन्न चित्त असतात.

अशाप्रकारे शुभलक्षणयुक्त मेघ मार्गशीर्ष शुक्लपासून वैशाख अंतापर्यंत दिसायला पाहिजे ही सर्व लक्षणे मेघगर्भ पुष्टीदायक आहेत.

१. मेघगर्भ धारणेच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात आहे त्यावर जर शुभग्रह गुरू, बुध, शुक्र यांपैकी शुभग्रहांची दृष्टी/युती असेल तर असे मेघगर्भ पुष्टीदायक असून वर्षाऋतुत खूप बरसतात.
२. रविचंद्र युति असून शुभग्रह दृष्ट/युत असता गर्भ पुष्टीदायक असते.
३. रवि व चंद्र एकाच नक्षत्रात असतील तरी गर्भपुष्टी दायक असते.
४. गर्भधारणा नक्षत्र जर अधिक वर्षा देणारे नक्षत्र जर अधिक वर्षा देणारे नक्षत्र असतील जसे पूर्व भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, रोहिणी या नक्षत्रात मेघगर्भ धारणा असेल तर वर्षा ऋतुत खूप पाऊस पडतो.
५. जर शततारका, आद्रा स्वाति, मघा, आश्लेषा या नक्षत्रात मेघगर्भ धारणा झाली असता खूप दिवसा पर्यंत पाऊस पडतो.
६. मेघगर्भ धारणाच्या वेळी उत्पति झाले नाहित जसे रवि/उपकेतु, मंगळ द्वारा नक्षत्र भेदन, चंद्र पापयुक्त/इष्ट, वीजपडणे, धुलीने भरलेली हवा सुटने, लाल ढंगानी दिशा चमकणे, भूकंप होणे, गंधर्व नगर, तामस कीलक दिसणे, ग्रहयुद्ध असणे इत्यादी गोष्टी झाल्या नाहित तर गर्भ पुष्टीदायक असतो.
७. मेघगर्भ लक्षणांतर दिव्य, अंतरिक्ष वा भूतलिय उचात असता गर्भनष्ट होते. अशावेळी अशाप्रकारचे उत्पात व्हायला नका तर गर्भपुष्टीदायक असते.
८. मेघगर्भ लक्षणादरम्यान खूप जोराचा पाऊस पडला तर मेघगर्भ नाश होतो, म्हणून त्यावेळी खूप जोराचा पाऊस पडायला नको.
९. अयन बदल २२ डिसेंबर मार्गशीर्ष मास सायन रविचे उत्तरायण सुरू होते. हया दिवशी गर्भधारणा संभव असता खूप पाऊस पडला तर गर्भनाश, म्हणून पाउस मामूली पडायला हवा तर पुष्टीदायक ठरते.
१०. ज्येष्ठा मासात खूप गर्मी असेल तर उत्तम वर्षा कारक असते. ज्येष्ठा शुक्लपक्षात आर्द्र ते स्वाति हया दहा नक्षत्रात पावसाच्या नक्षत्रात पाऊस पडला तर आषाढ, श्रावण मासात पाऊस पडत नाही. म्हणून ज्येष्ठात पाऊस न पडले म्हणजे उत्तर गर्भपुष्टी असुन वर्षाऋतुत चांगली वर्षा होते.
११. तिथीनुसार ज्येष्ठ शुक्ल पक्षात अष्टमी, नवमी, दशमी एकादशमी या चारी तिथिंना एकसामान हवामान असेल तर कल्याणकारक असते.

याप्रमाणे गर्भपुष्टी लक्षणे सांगितली आहेत व त्यावरून पावसाचा अंदाज वर्षा ऋतुच्या आधीच लावण्यात येतो हे वरील अभ्यासाकडुन समजते.

  1. ^ बृहत्संहिता, व्याख्याकार - पण्डित अच्युतानन्द झा