Jump to content

गर्जा महाराष्ट्र

गर्जा महाराष्ट्र
दूरचित्रवाहिनी सोनी मराठी
भाषा मराठी
प्रकार ऐतिहासिक, महाराष्ट्रीय
देश भारत
सूत्रधार जितेंद्र जोशी
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीत गर्जा महाराष्ट्र माझा
प्रसारण माहिती
पहिला भाग २५ ऑगस्ट २०१८
अंतिम भाग १६ फेब्रुवारी २०१९
एकूण भाग २६
निर्मिती माहिती
कथा संकलन वैभव छाया (भाग १५)
कालावधी २२ मिनिटे

गर्जा महाराष्ट्र ही २५ ऑगस्ट २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१९ या कालावधी दरम्यान सोनी मराठी दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी मालिका होती. ही मालिका दर शुक्रवारी प्रक्षेपित होत असे. अभिनेता जितेंद्र जोशी या मालिकेचे सूत्रसंचालक आहेत. गर्जा महाराष्ट्र मालिकेचे एकूण २६ भाग (एपिसोड) होते, प्रत्येक भागात एक-एक अशा एकूण २६ उल्लेखनीय महाराष्ट्रीय व्यक्तींच्या जीवनकथा प्रदर्शित करण्यात आल्या.

या अशा महाराष्ट्रीय व्यक्तीं होत्या की, ज्यांनी केवळ महाराष्ट्राचीच सांस्कृतिक ओळख आकारली नाही तर भारताच्या सांस्कृतिक विकासाचा मार्ग सुद्धा प्रशस्त केला. देशाला आकार देण्यात या महाराष्ट्रीयांनी जे सांस्कृतिक आणि बौद्धिक योगदान दिले, त्याचा इतिहास या मालिकेतून कालानुक्रमाने मांडला गेला आहे. या महाराष्ट्रीयांमध्ये संत, समाजसुधारक, राजकारणी आदींचा समावेश होता.

कलाकार

कलाकार व त्यांची भूमिका
  • प्रशांत चौडप्पा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भाग

भाग क्रमांकभागाचे नावप्रक्षेपित केल्याचा दिनांक
०१संत ज्ञानेश्वर२५ ऑगस्ट २०१८[]
०२संत तुकाराम१ सप्टेंबर २०१८
०३शिवाजी महाराज८ सप्टेंबर २०१८
०४बाजीराव पहिला१५ सप्टेंबर २०१८
०५जोतीराव फुले२२ सप्टेंबर २०१८
०६बाळ गंगाधर टिळक२९ सप्टेंबर २०१८
०७गोपाळ गणेश आगरकर६ ऑक्टोबर २०१८
०८रखमाबाई१३ ऑक्टोबर २०१८
०९जगन्नाथ शंकरशेठ२० ऑक्टोबर २०१८
१०विष्णूदास भावे२७ ऑक्टोबर २०१८
११शाहू महाराज३ नोव्हेंबर २०१८
१२हिराबाई पेडणेकर१० नोव्हेंबर २०१८
१३संत गाडगे बाबा१७ नोव्हेंबर २०१८
१४रघुनाथ धोंडो कर्वे२४ नोव्हेंबर २०१८
१५डॉ. बाबासाहेब आंबेडकर१ डिसेंबर २०१८
१६विश्राम घोले८ डिसेंबर २०१८
१७दादासाहेब फाळके१५ डिसेंबर २०१८
१८कर्मवीर भाऊराव पाटील२२ डिसेंबर २०१८
१९पांडुरंग सदाशिव साने२९ डिसेंबर २०१८
२०शिवकर बापूजी तळपदे५ जानेवारी २०१९
२१विनायक दामोदर सावरकर१२ जानेवारी २०१९
२२विष्णुपंत मोरेश्वर छत्रे२६ जानेवारी २०१९
२३विष्णू दिगंबर पलुसकर१९ जानेवारी २०१९
२४कमला सोहोनी२ फेब्रुवारी २०१९
२५विनोबा भावे९ फेब्रुवारी २०१९
२६शंकर आबाजी भिसे१६ फेब्रुवारी २०१९

हे सुद्धा पहा

संदर्भ