गरीबपूरची लढाई
गरीबपूरची लढाई
१९७१चे भारत-पाक युद्ध ह्या युद्धाचा भाग
T-55
दिनांक | नोव्हेंबर २०-२१, इ.स. १९७१ |
---|---|
स्थान | गरीबपूर, बांगलादेश |
परिणती | मित्रोबाहिनीचा निर्णायक विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
बांगलादेश (मुक्तीबाहिनी) भारत (डिसेंबर ३, १९७१पासून) | पाकिस्तान |
सेनापती | |
लेफ्टनंट कर्नल आर.के. सिंग | स्क्वॉड्रन लीडर परवेझ मेहदी कुरेशी |
सैन्यबळ | |
१४वी पंजाब रेजिमेंट, ४५वे घोडदळ | १०७वी इन्फंट्री ब्रिगेड, ३रे चिलखती दल |
बळी आणि नुकसान | |
३० सैनिक, ४ रणगाडे | १८० सैनिक, ३० रणगाडे, ३ एफ-८६ सेबरजेट |
गरीबपूरची लढाई भारत व पाकिस्तानमधील तिसऱ्या युद्धाची नांदी ठरलेली लढाई होती. नोव्हेंबर २०-२१, इ.स. १९७१ला झालेल्या या लढाईनंतर भारतीय सेनेने मुक्तीबाहिनीशी संधान बांधले व मित्रोबाहिनीची रचना केली. पुढील काही दिवसांत झालेल्या बोयराच्या लढाईत मित्रोबाहिनीने पूर्व पाकिस्तानात (आताचे बांगलादेश) असलेल्या पाकिस्तानी वायुसेनेच्या तुकड्यांचा पराभव केला व युद्धास तोंड फुटले.
गरीबपूर आणि बोयराच्या लढायांमध्ये पराभव पत्करलेल्या पाकिस्तानी सैन्यदलाने युद्धाच्या शेवटी भारतासमोर शरणागती पत्करली.