गम ग्वायकम
गम ग्वायकम हे दक्षिण अमेरिकेत आढळणारे झाड आहे. याची लागवड भारतातही झाली आहे. याची उंची १५-२० फूट असून हे सदाहरित झाड आहे. खोड भुरकट, तुकतुकीत, थोडे फार पेरूच्या खोडासारखे असून त्यावर पांढरे चगदे-चगदे असतात. संयुक्त पाने थोडी जाडसर, गडद हिरवी, चमकदार पर्णसंभार. फुलांचा हंगाम मार्च-एप्रिल मधे फुले गुच्छात उमलल्यावर पाकळ्या देठाकडे वाकलेल्या. फुलांचा रंग या झाडाला लाजबाब श्रेणीत ठेवणार. अतिशय आकर्षक आणि हटके. निळसर, गुलाबी छटेच्या छोट्या फुलांचे दाट गुच्छ भरभरून फुलतात आणि पाने झाकून टाकतात. फुलं कोमेजतात फिकट पांढऱ्या रंगाची होतात. फळं लहान चपटी, सोन-पिवळ्या रंगाची झाडाची उंची आणि विस्तार लक्षात घेता बागेत आणि कमी रुंदीच्या रस्त्यावर उपयुक्त असं हे झाड आहे.
हे झाड बहामास देशाचे राष्ट्रीय झाड आहे.[१]
संदर्भ
- वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक
- ^ "बहामासची राष्ट्रीय चिन्हे". बहामास तथ्य आणि आकडेवारी. 2009-01-27 रोजी पाहिले.