Jump to content

गतिमान एक्सप्रेस

गतिमान एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार अतिजलद प्रवासी सेवा
प्रदेशउत्तर प्रदेश, दिल्ली
चालक कंपनी उत्तर रेल्वे
मार्ग
सुरुवातहजरत निजामुद्दीन
थांबे विनाथांबा
शेवटआग्रा छावणी
अप क्रमांक १२०४९
डाउन क्रमांक १२०५०
अंतर १८८ किमी
साधारण प्रवासवेळ १०० मिनिटे
प्रवासीसेवा
बसण्याची सोय होय
झोपण्याची सोय नाही
खानपान समाविष्ट
निरीक्षण सोय मोठ्या खिडक्या
मनोरंजन वायफाय इंटरनेट
तांत्रिक माहिती
गेजब्रॉड गेज
वेग कमाल १६० किमी/तास
सरासरी ११२ किमी/तास

गतिमान एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अतिजलद प्रवासी सेवा आहे. अर्ध-द्रुतगती प्रकारची ही रेल्वेगाडी सध्याच्या घडीला भारतामधील सर्वात वेगवान सेवा असून ती दिल्लीच्या हजरत निजामुद्दीनआग्र्याच्या आग्रा छावणी ह्या दोन स्थानकांदरम्यानचे १८८ किमी अंतर १०० मिनिटांमध्ये पार करते. ह्या गाडीचा कमाल वेग १६० किमी/तास तर सरासरी वेग ११२ किमी/तास इतका आहे व ती दिल्ली व आग्र्यादरम्यान विनाथांबा धावते.

५ एप्रिल २०१६ रोजी गतिमान एक्सप्रेसचे भारताचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ह्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. वाय-फाय इंटरनेट, जीपीएस माहिती, स्वयंचलित दरवाजे इत्यादी अद्ययावत सोयी सुविधा असणाऱ्या गतिमान एक्सप्रेसच्या एक्झेक्युटीव्ह क्लासचे भाडे ₹१,५०० तर एसी चेअर कारचे भाडे ₹७५० इतके आहे. प्रवासभाड्यात शाकाहारी व मांसाहारी अल्पोपहार समाविष्ट आहे.

तपशील

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२०५०हजरत निजामुद्दीन – आग्रा छावणी०८:१०५०९:५०शुक्रवारखेरीज रोज
१२०४९आग्रा छावणी – हजरत निजामुद्दीन१७:५०१९:३०शुक्रवारखेरीज रोज

बाह्य दुवे