Jump to content

गणेशी लाल

गणेशी लाल (जन्म १ मार्च १९४१) हे भारतीय राजकारणी आणि ओडिशाचे विद्यमान राज्यपाल आहेत.[][]

श्री. गणेशी लाल

विद्यमान
पदग्रहण
२९ मे २०१८
मुख्यमंत्री नवीन पटनायक
मागील सत्यपाल मलिक

आमदार
कार्यकाळ
१९९६ – २०००
मतदारसंघ सिरसा,हरियाणा

जन्म १ मार्च, १९४१ (1941-03-01) (वय: ८३)
सिरसा, पंजाब, ब्रिटिश भारत (सध्याचे हरियाणा, भारत)
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू

वैयक्तिक जीवन

प्राध्यापक लाल यांचा जन्म सिरसा, हरियाणा येथे १ मार्च १९४१ रोजी झाला आणि त्यांनी इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली आहे . पुढे त्यांनी गणितात पदव्युत्तर पदवी मिळवली. ते अभ्यासात हुशार होते आणि एफए, बीए आणि एमए वर्गात प्रथम श्रेणीत प्रथम उत्तिर्ण झाले आणि त्यांनी सुवर्णपदकही मिळवले आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले आणि १९६४ ते १९९१ दरम्यान हरियाणाच्या विविध सरकारी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले.

राजकीय पार्श्वभूमी

१९६२ पासून, प्रा. लाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सक्रियपणे संबंधित आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिसार, रोहतक प्रांतामध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.

प्रा. लाल यांची राजकीय कारकीर्द भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तळागाळातील संघटनांपासून सुरू झाली आहे. ते हरियाणा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हरियाणाचे माजी अध्यक्ष आणि भाजप शिस्त समितीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. १९७६ मध्ये देशात आणीबाणीच्या काळात प्रा.लाल यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. रामजन्मभूमी आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

गणेशी लाल १९९६ मध्ये सिरसा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि १९९६-९९ मध्ये हरियाणा विकास पक्ष (HVP)-भाजप सरकारमध्ये मंत्रीही होते.[]

संदर्भ

  1. ^ "Kerala BJP chief Kummanam Rajasekharan appointed Mizoram Governor". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-05-25. 2022-01-19 रोजी पाहिले.
  2. ^ Service, Tribune News. "Haryana BJP leader Ganeshi Lal is new Odisha Governor". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2022-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ "RAJ BHAVAN ODISHA". www.rajbhavanodisha.gov.in. 2022-01-19 रोजी पाहिले.