गणेश संग्रहालय (सारसबाग)
गणेश संग्रहालय पुणे शहरातल्या सारसबागेतले हे गणपतीच्या मूर्तींचे संग्रहालय आहे.[१] गोविंद मदाने, आणि पांडुरंग जोग यांनी त्यांच्या जवळील गणेशमूर्तींचा संग्रह पर्वतीवरील देवदेवेश्वर संस्थानच्या स्वाधीन केला, त्यांतून हे संग्रहालय उभे राहिले.
वैशिष्ट्य
या गणेश संग्रहालयात अफगाणिस्तान, इंडोनेशिया, नेपाळ, इत्यादी देशांमधून आणलेल्या मूर्ती आहेत. यात्रेला निघालेला गणेश, वाद्य वाजवणारा गणेश, स्त्रीरूपातील गणेश, हनुमानरूप गणेश, अशा साधारणपणे ५०० मूर्ती या संग्रहालयात आहेत. या गणेशमूर्ती काच, चिनी माती, दगड, लाकूड आदी विविध द्रव्यांपासून बनवलेल्या आहेत.
चित्रदालन
- गणेश संग्रहालय,सारसबाग(१)
- गणेश संग्रहालय,सारसबाग(२)
- गणेश संग्रहालय,सारसबाग(३)
- गणेश संग्रहालय,सारसबाग (४)
- गणेश संग्रहालय,सारसबाग (५)
- गणेश संग्रहालय,सारसबाग (६)
संदर्भ
- ^ "Talyatla Ganpati, Saras Baug and the making and unmaking of Pune's Parvati Lake". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-09-23. 2024-03-11 रोजी पाहिले.