गणेश देवी
डॉ. गणेश नारायणदास देवी (जन्म :१९५० भोर) हे एक भारतीय साहित्य समीक्षक आणि भाषाशास्त्रज्ञ आहेत. बडोद्याच्या भाषा संशोधन केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.
डॉ. गणेश देवी हे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड़ विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक होते. डॉ. गणेश आणि त्यांची पत्नी सुरेखादेवी 'भाषा' नावाची एक बिनसरकारी संस्था चालवतात. ही संस्था गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात तेथील बोलीभाषांवर काम करते.
भारतातील बोलींवर आणि जिवंत व नष्ट होत चाललेल्या ७८० भाषांवर संशोधन करून लिहिलेला गणेश देवी यांचा पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ इ.स. २०१०मध्ये प्रसिद्ध झाला.
डॉ. गणेश देवी यांना त्यांच्या साहित्यातील आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीसाठी इ.स. २०१४ साली पद्मश्री प्रदान झाली.
३-४ एप्रिल २०१६ या काळात पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या बहुभाषिक घुमान साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत.
डॉ. गणेश देवी यांचे साहित्य
- आदिवासी जाणे छे (गुजराती)
- ऑफ मेनी हीरोज (इंग्रजी, १९९७)
- आफ्टर ॲम्नेसी ((इंग्रजी, १९९२)
- इंडिया बिटवीन ट्रॅडिशन ॲन्ड मॉडर्निटी (इंग्रजी, १९९७)
- इंडियन लिटररी क्रिटिसिझम : थिअरी ॲनड इंटरप्रिटेशन (इंग्रजी, २००२)
- इन ॲनदर टंग (इंग्रजी, २०००)
- की वर्ड्ज : ट्रुथ (इंग्रजी)
- क्रिटिकल थॉट (इंग्रजी, १९८७)
- दि जी.एन. देवी रीडर (इंग्रजी, २००९)
- ए नॉमॅड कॉल्ड थीफ (इंग्रजी, २००६)
- पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे ऑफ इंडिया (२०१०)
- पेन्टेड वर्ड्ज : ॲन ॲन्थॉलॉजी ऑफ ट्रायबल लिटरेचर (इंग्रजी, २००२)
- वानप्रस्थ (मराठी)