Jump to content

गणपत पाटील

जन्म१९१८/१९१९
मृत्यूमार्च २३, २००८
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपट केला इशारा जाता जाता
सोंगाड्या
पत्नी प्रेमलाताई
अधिकृत संकेतस्थळhttp://www.imdb.com/name/nm1933131/

गणपत पाटील मराठी चित्रपट अभिनेते होते. तमाशापटांतील ’नाच्या’च्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल ते ओळखले जात.

जीवन

गणपत पाटील यांचा जन्म कोल्हापुरात एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.
दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले.
त्यासुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.
चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची - म्हणजेच ’नाच्या’ची - आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले.

कारकीर्द

चित्रपट

वर्ष चित्रपट
१९३८बालध्रुव (बालकलाकार, मॉबमध्ये)
१९४८बलिदान
१९४८वन्दे मातरम
१९४९मीठभाकर
१९५०राम राम पाव्हणं
१९५१पाटलाचा पोर
१९५१शारदा
१९५२छत्रपती शिवाजी (अनेक भूमिका)
१९५२मायबहिणी
१९५२मायेचा पाझर
१९५३माझी जमीन
१९५३वादळ
१९५४तारका
१९५६गाठ पडली ठकाठका
१९५६पावनखिंड
१९५७नायकिणीचा किल्ला
१९५९आकाशगंगा
१९६०शिकलेली बायको
१९६२गावची इज्जत
१९६२प्रीतिविवाह
१९६२सूनबाई
१९६३थोरातांची कमळा
१९६४पाठलाग
१९६४सवाल माझा ऐका
१९६४वाघ्या मुरळी
१९६५केला इशारा जाता जाता
१९६५मल्हारी मार्तंड
१९६५रायगडचा राजबंदी
१९६७बाई मी भोळी
१९६७देवा तुझी सोन्याची जेजुरी
१९६७सांगू मी कशी
१९६८सुरंगा म्हनत्यात मला
१९६८छंद प्रीतिचा
१९६८धन्य ते संताजी धनाजी
१९६८एक गाव बारा भानगडी
१९६९खंडोबाची आण
१९६९गणगौळण
१९७०अशी रंगली रात
१९७०गणानं घुंगरू हरवलं
१९७१अशीच एक रात्र
१९७१लाखात अशी देखणी
१९७१सोंगाड्या
१९७२पुढारी
१९७४सून माझी सावित्री
१९७४सुगंधी कट्टा
१९७५पाच रंगाची पाच पाखरं
१९७६जवळ ये लाजू नको
१९७८कलावंतीण
१९७८नेताजी पालकर
१९७९ग्यानबाची मेख
१९७९हळदी कुंकू
१९८०मंत्र्याची सून
१९८०सवत
१९८१पोरी जरा जपून
१९८१तमासगीर
१९८२दोन बायका फजिती ऐका
१९८२राखणदार
१९८७बोला दाजिबा
१९८७इरसाल कार्टी
१९९०थांब थांब जाऊ नको लांब
१९९३लावण्यवती
२००६मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे

नाटके

  • कॉलेजकुमारी (स्त्री भूमिका)
  • स्टेट काँग्रेस
  • बेबंदशाही
  • आगऱ्याहून सुटका
  • झुंझारराव
  • मानापमान
  • संशयकल्लोळ
  • कोकणची नवरी
  • ऐका हो ऐका
  • जाळीमंदी पिकली करवंदं
  • सोळावं वरीस धोक्याचं
  • नर्तकी
  • राया मी डाव जिंकला
  • लावणी भुलली अभंगाला
  • आता लग्नाला चला
  • आल्या नाचत मेनका रंभा

पुरस्कार

  • २०१३ सालचा विशेष दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार गणपत पाटील यांना जाहीर झाला आहे.

बाह्य दुवे