Jump to content

गड नदी

गड नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशसिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र

गड नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. केव नदी व गड नदी यांचा संगम होऊन ती काजळी या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाजवळ गड नदीचा उगम होतो. केव नदीला साखरपा येथे गड नदी येऊन मिळते. काजळी नदी पश्चिमवाहिनी असून रत्‍नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.

पहा :- महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

साचा:रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या