Jump to content

गजाननबुवा जोशी

गजाननबुवा जोशी
आयुष्य
जन्म ३० जानेवारी, इ.स. १९११
जन्म स्थान भारत
मृत्यू इ.स. १९८७/१९८८
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
घराणे ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

गजानन अनंत जोशी तथा गजाननबुवा जोशी (३० जानेवारी, इ.स. १९११ - इ.स. १९८७/१९८८) हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक गायक.[ संदर्भ हवा ]

पूर्वायुष्य

गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.[ संदर्भ हवा ]

सांगीतिक कारकीर्द

गजाननबुवा हे गायनासोबतच व्हायोलिनही तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते. पं मधुबुवा जोशी हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे पं उल्हास कशाळकर, पद्मा तळवलकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ