गंडारादित्य
राजा गंडारादित्य हा शिलाहार वंशाचा शासक होता.[१] त्याने ११०५–४० या काळात कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव या जिल्ह्यांतील काही प्रदेशांवर राज्य केले. गंडारादित्याचे अनेक ताम्रपट सापडले आहेत. त्याने इरुकुडी गावाजवळ गण्डसमुद्र नावाचा विशाल तलाव बांधून त्याच्या काठावर हिंदू, बौद्ध व जैन या धर्मांची देवळे बांधली होती. त्याचा पुत्र विजयादित्य (कार. सु. ११४०–७५) याने उत्तर कोकणचा राजा पहिला अपरादित्य याला त्याची गादी मिळवून देण्यास साहाय्य केले होते.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973. p. 68.
- ^ Nāgarī saṅgama: Nāgarī Lipi Parishad kī traimāsika mukha patrikā (हिंदी भाषेत). Nāgarī Lipi Parishad. 2000. pp. ३.