गंगाधर महांबरे
गंगाधर महांबरे |
---|
गंगाधर महांबरे (महाम्बरे) (जन्म : जानेवारी ३१, १९३१; - डिसेंबर २३, २००८) हे मराठी लेखक, कवी व गीतकार होते.[ संदर्भ हवा ]
ओळख
त्यांचा जन्म मालवण येथे झाला. पुण्याच्या "फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले.[ संदर्भ हवा ]
काव्य/गीत लेखनाबरोबरच त्यांनी इतर (विशेषतः कोकणातले व्यवसाय व त्या संबंधीचे मार्गदर्शन) लिखाणही केले आहे. त्यांच्या काही मालवणी कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.[ संदर्भ हवा ]
प्रकाशित साहित्य
- ऑटोरिक्षा (देखभाल व दुरुस्ती)
- आनंदाचे डोही...
- उत्तुंगतेचा सहजसस्पर्श (सहलेखिका - अरुंधती महाम्बरे)
- महिलांसाठी उद्योग व्यवसाय
- लाखमोलाचे उद्योग व्यवसाय
- उषःकाल (कवितासंग्रह)
- ओळखपाळख
- किशोरनामा (कथा)
- गांधीजीप्रणीत उद्योग-व्यवसाय
- भगवान गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म
- ग्रामीण उद्योगाच्या यशस्वी वाटा
- चला जाणून घेऊ या! अंकशास्त्र
- चार्ली चॅप्लिन : काल आणि आज
- जसे आठवले तसे
- पी. सावळारामांची चित्रगीते
- विस्मरणापलीकडील पु .ल.
- पु. ल. देशपांडे यांची चित्रगीते
- फिल्म उद्योगी दादासाहेब फाळके
- प्रतिभावंतांच्या सहवासात
- प्रवासातील प्रतिभावंत
- बिजलीचा टाळ (कादंबरी)
- भावगीतकार ज्ञानेश्वर
- मौलिक मत्स्यव्यवसाय
- मराठी गझल
- मराठी युगुलगीते
- महाराष्ट्र गौरव गीते
- महाराष्ट्रातील समाजसुधारक (सहलेखक - सुरेश ढमाल)
- ग.दि. माडगुळकरांची चित्रगीते
- माणसं जनातील मनातील
- मौनांकित (चरित्र)
- मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन
- मोटरसायकल दुरुस्ती : तंत्र व मंत्र
- मोडी - शिका
- रंग जीवनाचे (कादंबरी)
- रसिकेषु (ललित)
- कविश्रेष्ठ राजा बढे
- लघुउद्योगाची लक्ष्मणरेषा
- वॉल्ट डिस्ने (चरित्र)
- विद्यार्थ्यासाठी उद्योग व्यवसाय
- विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक कल्पकता
- वि.स. खांडेकरांची चित्रगीते
- विस्मरणापलीकडील पु .ल.
- व्यक्तिचित्रे
- शुभंकरोती
- साक्षेपी समीक्षा
- सैगल
पदलेखन केली नाटके
- गा भैरवी गा
- चाफा बोलेना
- तेथे कर माझे जुळती
- पैसे झाडाला लागतात
- संतांची कृपा
- सर्वस्वी तुझाच
गीतलेखन केलेले चित्रपट
- धाकटी मेहुणी
- युगे युगे मी वाट पाहिली
- सोबती
- सौभाग्यकांक्षिणी
लोकप्रिय गीते
- आली आली सर ही ओली
- कंठातच रुतल्या ताना
- चिमकुले घरकुल अपुले
- जीवनाची वाट वेडी
- तुझ्या पंखावरूनि या
- तू विसरुनि जा रे
- त्या तुझिया चिंतनात
- देवाघरच्या फुला
- धुंद धुंद ही हवा
- ना साहवे विराणी
- निळा सावळा नाथ
- पाण्यातले पाहाता प्तिबिंब
- पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव
- बिजलीचा टाळ नभाचा मृदंग
- बोलून प्रेमबोल तू लाविलास
- रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते
- रंगुनी श्रीहरी कीर्तनी
- वनी एकटी दमयंती
- वाटे भल्या पहाटे यावे तुझ्या महाली
- वायूसंगे येई श्रावणा
- ना साहवे विराणी
- शुभंकरोती म्हणा मुलांनो
- संधीकाली या अशा
- साउलीस का कळे[ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे
- अवीट गोडीचे महांबरे[permanent dead link]