Jump to content

गंगाधर नारायण जोगळेकर

डॉ. गंगाधर नारायण जोगळेकर ऊर्फ गं.ना. जोगळेकर (२ जून, इ.स. १९३५ - १४ ऑगस्ट, इ.स. २००७; पुणे) हे मराठी लेखक, भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक व मराठी भाषेचे प्राध्यापक होते. हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते.

कारकीर्द

जोगळेकर पेशाने प्राध्यापक होते. त्यांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात, तसेच सांगलीमध्ये विलिंग्डन महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. ते काही काळ फर्ग्युसनचे प्राचार्य होते. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम पहिले. मराठी प्राध्यापक संघटनेची बांधणीत त्यांचा सहभाग होता.

इ.स. १९५७ मध्ये त्यांनी लेखनास प्रारंभ केला[ संदर्भ हवा ]. सुरुवातीच्या काळात त्यांनी काव्यलेखन ( विडंबन लेखन) केले. पुढे त्यांनी प्रामुख्याने भाषा, व्याकरण, समीक्षा या क्षेत्रात लेखन केले.

प्रकाशित साहित्य

साहित्यकृतीसाहित्यप्रकारप्रकाशकप्रकाशन वर्ष (इ.स.)आवृत्ती
मराठी टीकाकार (सहलेखक)इ.स. १९७९
साहित्य समीक्षा: स्वरूप व विकास (सहलेखक)इ.स. १९८०
महाराष्ट्र आणि मराठी भाषाश्रीविद्या प्रकाशन
अभिनव भाषाविज्ञानसुविचार प्रकाशन मंडळइ.स. १९८७
मुद्रा उपचार पद्धती प्रसाद प्रकाशन
मराठी भाषेचा इतिहास (पुस्तक) श्रीविद्या प्रकाशन
उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञता ग्रंथ) - संपादक - डॉ.केतकी मोडक, संतोष शेणईसुजाता शेणईपद्मगंधा प्रकाशनइ.स. २०१२ प्रथमावृत्ती

अधिक वाचन

  • Empty citation (सहाय्य)