Jump to content

गंगा प्रसाद

श्री. गंगा प्रसाद

१५ वे सिक्कीमचे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
२६ ऑगस्ट २०१८
मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग, प्रेमसिंग तमांग
मागील श्रीनिवास दादासाहेब पाटील

मणिपूरचे राज्यपाल (अतिरिक्त कार्यभार)
कार्यकाळ
१२ ऑगस्ट २०२१ – २६ ऑगस्ट २०२१
मागील नजमा हेपतुल्ला
पुढील ला. गणेशन

कार्यकाळ
५ ऑक्टोबर २०१७ – २५ ऑगस्ट २०२१
मागील बनवारीलाल पुरोहित
पुढील तथागत रॉय

जन्म ८ जुलै, १९३९ (1939-07-08) (वय: ८५)
पटना, बिहार
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी श्रीमती. कमलादेवी
अपत्ये
धर्म हिंदू

गंगा प्रसाद हे एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या सिक्कीम राज्याचे राज्यपाल[][] आणि मेघालयचे माजी राज्यपाल आहेत. ते बिहार विधान परिषदेचे सदस्य होते आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते होते. बिहारमधील एनडीएच्या काळात त्यांनी बिहार विधान परिषदेचे नेतेपदही भूषवले होते. ते जनसंघाशी जोडले गेले आणि आजपर्यंत त्याच विचारधारेशी संबंधित आहेत. ते आर्य समाजाचे अनुयायी आहेत आणि त्यांनी बिहार आर्य समाज प्रतिनिधी सभा विभागाचे प्रधान (प्रमुख) म्हणून काम केले आहे. राजकीय वर्तुळात ते 'गंगा बाबू' या नावाने प्रसिद्ध आहेत.

संदर्भ

  1. ^ "Welcome to the official website of Rajbhavan, Gangtok, Sikkim". www.rajbhavansikkim.gov.in. 2022-01-19 रोजी पाहिले.
  2. ^ "In Gangtok, Ganga Prasad takes oath as new Governor of Sikkim, replaces Shriniwas Patil-India News , Firstpost". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2018-08-27. 2022-01-19 रोजी पाहिले.