Jump to content

ग.वा. करंदीकर

डाॅ. ग.वा. करंदीकर (जन्म : सांगली, इ.स. १९२५; - पुणे, इ.स. २०१६) हे संतसाहित्याचे अभ्यासक व संशोधनवृत्ती जोपासणारे एक मराठी शिक्षक होते. मराठी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्यांनी शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला तत्कालीन ‘बीटी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी पुणे आणि सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. १९६५ ते १९८५ या दरम्यानच्या काळात ते पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक होते.

१९६४ साली सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्यात रस असलेल्या करंदीकर यांच्यावर सहकार्यवाह म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. पुसद येथे १९८५ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्येही त्यांनी सहकार्यवाह म्हणून काम केले.

महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमांचे संशोधन आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याची जबाबदारी असलेल्या ‘बालभारती’च्या मराठी अभ्यास मंडळाचे ते सदस्य होते.

मराठी व्याकरणाच्या संदर्भात सखोल माहिती देणाऱ्या शास्त्रीय मराठी व्याकरण कोश या ग्रंथाच्या पुरवणीचे संपादन करंदीकर यांनी केले होते.

१९८५ ते २०१२ या दरम्यानच्या काळात करंदीकरांनी पुण्यातील गीताधर्म मंडळाचे सहकार्यवाहपद भूषविले. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने अनेक नवनवे उपक्रम राबविले. ‘समर्थ रामदासांची आध्यात्मिक स्फुट प्रकरणे’ या विषयावर ग.वा. करंदीकरांनी तत्कालीन पुणे विद्यापीठातून वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी पीएच.डी. मिळवली

करंदीकरांनी लिहिलेली पुस्तके

  • ‘युगंधर योगीश्वर अवतार’ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भावगीतात्मक चरित्र