Jump to content

ख्वाजा नझीमुद्दीन

ख्वाजा नझीमुद्दीन

हाजी सर ख्वाजा नझीमुद्दीन (देवनागरी लेखनभेद: ख्वाजा नझिमुद्दीन; बंगाली: খাজা নাজিমুদ্দীন ; उर्दू: خواجہ ناظم الدین ; रोमन लिपी: Khawaja Nazimuddin;) (जुलै १९, इ.स. १८९४ - ऑक्टोबर २२, इ.स. १९६४) हा बंगाली राजकारणी व पाकिस्तानाचा दुसरा गव्हर्नर-जनरल, तसेच दुसरा पंतप्रधान होता. पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर-जनरल मुहम्मद अली जीना यांच्या मॄत्यूनंतर तो सप्टेंबर १४, इ.स. १९४८ ते ऑक्टोबर १७, इ.स. १९५१ या कालखंडात दुसरा गव्हर्नर-जनरल म्हणून अधिकारारूढ होता. पाकिस्तानाचा पहिला पंतप्रधान लियाकत अली खान याच्या हत्येनंतर १७ ऑक्टोबर, इ.स. १९५१ रोजी पाकिस्तानाचा दुसरा पंतप्रधान बनला. पाकिस्तानात त्या काळी उतभवलेल्या बंगाली-पंजाबी भाषक संघर्षाच्या व अहमदिया-उर्वरित मुस्लिमांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल १७, इ.स. १९५३ रोजी तत्कालीन गव्हर्नर-जनरल गुलाम मुहम्मद याने नझीमुद्दिनास पंतप्रधानपदावरून हटवले.

बाह्य दुवे