खोबरेल तेल
खोबरेल तेल हे नारळाच्या आत असलेल्या खोबऱ्यासून बनवले जाते. दक्षिण भारतात या तेलाचा उपयोग बहुतेक लोक खाद्यतेल म्हणून करतात. नारळाच्या तेलामध्ये
र (?)ॲसिडचे चांगल्याप्रकारे मिश्रण झालेले असते. नारळामधील लॅरिक एसिड माणसाला विविध संक्रमणांशी लढण्यास साहाय्यभूत असते. नारळाच्या तेलामध्ये बरीच जीवनसतत्त्वे आणि खूप काही नैसर्गिक औषधी गुण असतात.नारळाच्या तेलाचा दैनिक उपयोग केल्याने खूप लाभ होऊ शकतो.
यासाठी नारळाचे तेलास नैसर्गिक तेल असे म्हणले जाते.
खोबऱ्याचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामूळे केसांना लावण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
खोबरेल तेलाचे उत्पादन
नारळ तेल नारळापासून कोरड्या किंवा ओल्या प्रक्रिया या दोनही प्रकाराने काढता येते.
ओली प्रकिया
या प्रक्रियेत एक चांगला नारळ घेऊन त्यातील आतील भाग काढून घेतात व त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतात. ते तुकडे बारीक वाटले जातात व त्यात थोडे पाणी मिसळून एका मलमलचा कपड्यामध्ये बांधून ठेवतात. त्यानंतर ते पिळून किंवा दाबून त्यांतून तेल काढले जाते. त्यानंतर नारळाचे दूध वेगळे केले जाते. पाण्यापेक्षा तेल हलके असल्याने ते पाण्यावर तरंगू लागते. याला १२ ते २४ तास लागतात. त्यानंतर नारळाचे तेल काढले जाते. दक्षिण भारतात बहुतेक लोक घरीच तेल बनवतात.
कोरडी प्रक्रिया
कोरड्या प्रकियेमध्ये नारळाचे तुकडे केले जातात व ओव्हनमध्ये त्यातील सुमारे १० ते १२% ओलावा सुकवला जातो.त् यानंतर लगेच त्या नारळाचा तुकड्यांना दाबून तेल काढले जाते.
खाद्य उपयोग
नारळाचे तेल सामान्यतः अन्न शिजवताना फोडणीसाठी वापरतात. विशेषतः पदार्थ तळताना तेलाचा जास्त वापर करतात. दक्षिण आशियाई भाज्यांमध्ये सुगंध येण्याकरता नारळाचे तेल वापरतात.
हे सुद्धा पहा
- नारळाचे पाणी :
नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर स्रीने आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. ओले तसेच सुके खोबरे शांती देणारे, कामशक्ती वाढवणारे, पोट साफ होण्यास मदत करणारे, अर्थात बद्धकोष्ठाचा नाश करणारे आहे. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे. त्वचेचे आरोग्य त्यामुळे सुधारते. मात्र, नारळाच्या अतिवापराने कोलॅस्टेराॅल वाढते व हार्टअटॅकचा संभव वाढतो.
- नारळाचे दूध :
नारळाच्या तेलाप्रमाणेच नाराळाच्या दुधाचे उपयोग आहेत. घोव्यातल्या पाककृती कारावायास नाराळाचे दूध अत्यावश्यक असते.
कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध सर्वोत्तम ठरते. कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दूधाने चेहऱ्याला मसाज केला तर, त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत आणि आभायुक्त दिसायला लागते. खरे पाहता त्वचेसाठी नारळाचे दूध म्हणजे एक वरदानच आहे. या व्यतिरिक्त फेशियल मसाज करताना देखील नारळाचे दूध क्रीममध्ये मिसळून वापरतात. असे केल्याने त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
त्वचेप्रमाणे डोक्यावरील केसांसाठीही नारळाचे दूध अतिशय पोषक आणि गुणकारी ठरते. टाळूची त्वचा आणि केस वाढत नसल्यास नारळाच्या दुधाचा उपयोग उपकारक ठरेल. नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ईची गोळी फोडून घातली व त्या मिश्रणाने टाळूला हलक्या हाताने मसाज केल्यास लाभदायक ठरतो. असे आठवड्यातून किमान दोनदा केल्यास निश्चितच केसांचे आणि टाळूच्या त्वचेचे आरोग्य सुधारते.
पर्यटन स्थळे
संदर्भ
- ^ नारळाच्या तेलाचे फ़ायदे (2016-12-02). "नारळाच्या तेलाचे फायदे". MajhiMarathi (इंग्रजी भाषेत). 2022-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-07 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)