खोबरे
नारळाच्या कठीण कवचाच्या आत असलेला भाग. याचे अनेक उपयोग आहेत.यापासुन खोबरेल तेल बनते. खोबऱ्याचा उपयोग स्वयंपाकात व खाद्यपदार्थात करतात. नारळाच्या ताज्या खोबऱ्यात ५० ते ५५ टक्के पाणी असते. त्यात कर्बोदके २० टक्के, मेद ३६ टक्के, प्रथिने चार टक्के असतात. वाळलेल्या खोबऱ्यामध्ये पाच ते सहा टक्के पाणी असते.