खोंडामळी
?खोंडामळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नंदुरबार |
जिल्हा | नंदुरबार जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा = अहिरानी,आदिवासी, | |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२५६४ • एमएच/39 |
खोंडामळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे.
खोंडामळी हे गाव नंदुरबार जिल्हा पासून 15 कि.मी. अंतरावर उत्तरपुर्व दिशेला त्यावेळी साधारण 5000 हजार लोकसंख्या असणार हे गाव. गावाच्या आजुबाजुला 2/3 कि.मी अंतरावर असणारे काही गावे भागसरी,कलमाडी, कानळदा, विखरण, बामडोद, समशेरपुर, नाशिंदा बोराळा, वैगेरे. गावची सुरुवातच खुप सुंदर ती म्हणजे मराठी शाळा समोरच मोठा पाण्याचा तलाव. प्रामुख्याने शेती व्यवसाय असलेल्या या गावात बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. साक्षरतेचे प्रमाणही जवळपास ९० टक्के आहे.
लळितची परंपरा जोपासणारे खोंडामळी
अशा खोंडामळी गावात ‘दोध्यादेव’ या ग्रामदेवतेचा सण कृषी संस्कृतीचे प्रतीक म्हणून आजही साजरा केला जातो. दोध्यादेव या ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त सांगतेच्या आदल्या रात्री लळिताचा खेळ सर्व गावकरी वर्गणी गोळा करून साजरा करतात. नरकचतुर्थीनंतरचे बारा दिवस गायी म्हशींचे दूध साठवले जाते. या काळात दूध कोणीच खायचे नसते, अगदी चहा सुद्दा बिनदुधाचा करावा, दूध विकू नये, दुधी भोपळा खाऊ नये, शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून दहीपुरीचा प्रसाद गावातील गरीबांना आणि बाहेरून आलेल्यांना अगत्यपूर्वक खिलावायचे असे काही नियम आजही कटाक्षाने पाळले जातात. नंदुरबार ही नंदराजाची नगरी अर्थात गवळी राजाची नगरी म्हणून ओळखली जाते. गवळ्यांचा राजा भगवान श्रीकृष्णाचे रूप म्हणजे दोध्यादेव. शेतीपूरक व्यवसाय म्हणून गायी-म्हशींचे पालन व दुग्धव्यवसाय आजही अनेकांच्या चरिथार्थाचे साधन आहे. कृषी संस्कृतीचे प्रतिक म्हणून दोध्यादेवाचा उत्सव तेरा दिवस साजरा केला जातो. जागरणाच्या रात्री लळिताचा खेळ केला जातो. खोंडामळी परिसरातील भागसरी, बामडोद, कलमाडी, कोळदा, विखरण, कानळदा, नाशिंदा, सिंदगव्हाण या गावातील लोक भक्तीभावाने लळिताचा खेळ पाहण्यासाठी पूर्वी पायी येत. आता मोटरसायकल वा अन्य चारचाकी वाहनाने येतात. या दिवशी जुगारही मोठ्या प्रमाणात खेळला जातो. लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेल्या या लळित खेळाची परंपरा तीनशे वर्षापासून रुढ असावी, असे या खेळातील शेठजीचे पात्र करणारे माजी सरपंच भाईदास अंबर पाटील सांगतात. विठ्ठल मंदिराच्या जिर्णोद्धारातून शिल्लक राहिलेल्या व गावाचे तत्कालिन नेते कै. गजमल तुळशीराम पाटील यांनी दिलेल्या देणगीतून सुरत येथून खरेदी केलेले लळितांची सोंगे (मुखवटे), साज, कपडे, केशभूषा, वेशभूषेचे साहित्य आजही मोठ्या आनंदाने वापरले जाते. विठ्ठल मंदिरातील पेटारात हे साहित्य जपून ठेवण्यात आले आहे. पूर्वी माती वा कागदाच्या लगद्यांनी ही मुखवटे बनविली जात. तेव्हा उत्तम जाधव (न्हावी) हे ते काम करत. मात्र आता त्यांच्या निधनानंतरही परंपरा चालविणारे त्याचे चिरंजीव पुंडलिक न्हावी यांच्या मते सोंगे तयार करणे, रंग देणे हेही भक्तीचा, साधनेचा एक मार्ग आहे. दुष्काळ, रोगराई येऊ नये. धनधान्य पिकावे, वंश प्राप्ती व्हावी यासाठी लळिताचा खेळ पूर्वी केला जाई. कधी कधी नवस फेडण्यासाठी सोंगांच्या रंगाचा व लळिताचा इतर खर्च केला जातो. परंतु या समजूती आता कालबाह्य झाल्या आहेत.
खोंडाळी गावात; बच्छाव, सावंत, वसईकर, बाविस्कर, राजपुत, गिरासे, राठोड, येशी, बोरसे, कोळी, न्हावी, जावरे, सामुद्रे, पाटील, भिल्ल, पाडवी इत्यादीं आडनाव असेली लोक आहेत.
भौगोलिक स्थान
१ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. खोंडामळी हे साधारणत:15 कि.मी. अंतरावर असणार गाव भौगोलिक स्थान हे नंदुरबार जिल्हा 21.00 ते 22.03 उत्तर अक्षांश व 73.31 ते 74.32 पूर्व रेखांश या. दरम्यान पसरलेला आहे.
हवामान
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार उष्ण असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
प्रेक्षणीय स्थळे
खोंडामळी गावात विठ्ठल मंदिर, खोंडस महादेव मंदिर, आणि दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे. खोंडामळी गावा पासून 5 कि.मी. अंतरावर नाशिंदा गावी पाहुबा ऋषी देवस्थान आहे. तसेच दक्षिण काशी म्हणुन ओळख असलेल प्रकाशा हे गाव अवघ्या 10 कि.मी. अंतरावर आहे.
नागरी सुविधा
खोंडामळी येथे जवळ जवळ सगळ्या नागरी सुविथा (सरकारी बॅक, शाळा, दवाखाना, दुरध्वनी केंद्र, विद्युत केंद्र, माध्यमिक विद्यालये, किराणा दुकाणे, प्रवासा करीता महाराष्ट्र शासनाच्या बसेस इत्यादीं.
जवळपासची गावे
कोळदा, भागसरी, कलमाडी, बामडोद, समशेरपुर, बोराळा, नाशिंदा, विखरण, शिंदगव्हाण, काकळदा, भालेर, कानळदा, वळवद, दहिंददुले, धामडोद इत्यादी.