Jump to content

खैरा बाड्डा

खैरा बाड्डा (इंग्लिश:Marbled Teal; हिंदी:फटिक जल; संस्कृत:क्षयी हंस,क्षयी हंसक; गुजराती: धोळू बतक, सफेद मघली, सफेद मुर्गाबी) हा एक पक्षी आहे.

नर व मादी दिसायला सारखे असतात त्यांच्या दोघांचाही आकार बदकापेक्षा मोठा व राखी तपकिरी वर्णाचा असून त्यावर पिवळट,करडे आणि काळसर रंगाचे ठिपके आहेत डोळ्यांपासून मानेपर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा.खाली पांढुरक्या रंगावर तपकिरी रंगाचे पट्टे आहेत.

Marbled.teal.arp.600pix

हा पक्षी काळानुसार त्याच्या राहण्याच्या ठिकाणी बदल करतो.या पक्ष्याची विस्तृती ही खूप लांबवर पसरलेली आहे तो हिवाळ्यात पाकिस्तानमध्ये तर उत्तर भारत ते दक्षिणेकडे अहमदनगर,पूर्वेकडे आसाम,पुणे तसेच मे ते जून या काळात हा पक्षी बलुचिस्तान आणि सिंधमध्ये आढळतो.झिलाणी हे त्याचे निवासस्थान आहे.

Marbled Teal

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली