Jump to content

खेळणा नदी

खेळणा नदी
इतर नावे केलना नदी
उगम केळगाव (मुर्डेश्वर)
पाणलोट क्षेत्रामधील देशछत्रपती संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते खेळणा ही पूर्णा नदीची उपनदी आहे.
धरणे खेळणा धरण (पालोद-मध्यम प्रकल्प )

खेळणा नदी ही महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक नदी आहे. हिचा उगम केळगाव मुर्डेश्वर येथून झाला असून, उगमानंतर ती आग्नेय दिशेकडे वाहत जाते. उगमस्थानी शंकराचे हेमाडपंती देऊळ असून श्रावण महिन्यात तेथे भक्तांचा पूर वाहू लागतो. खेळणा नदीवरचे पहिले छोटे धरण हे केळगावला आहे. त्यानंतरचे धरण हे लिहाखेडी येथे आहे. या धरणांतून सिल्लोड, भराडी अशा निमशहरी गावांना पाणीपुरवठा होतो. नदीचा पुढचा प्रवास हा भोकरदन तालुक्यातून होतो. जाफ्राबाद येथे खेळणा नदीचा पूर्णा नदीशी संगम होतो. या नदीमुळे सिल्लोड, भोकरदन तालुक्यांतला शेतकरीवर्ग समृद्ध झाला आहे.