खेळ विषयावरील चित्रपट
क्रीडाप्रकार किंवा मैदानी खेळ ह्या विषयाची पार्श्वभूमी असलेले फारच थोडे भारतीय कथापट आहेत. मराठीत तर जवळजवळ नाहीतच, आहेत ते हिंदीत. अशा चित्रपटांचा हा परिचय :-
अनेक वर्षांपूर्वी, देव आनंद नायक आणि माला सिन्हा नायिका असलेला 'लव्ह मॅरेज' नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातला नायक क्रिकेट खेळाडू होता, पण तो प्रत्यक्ष क्रिकेट खेळताना दाखवला नव्हता.
कुमार गौरवने क्रिकेट ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या एका हिंदी चित्रपटात काम केले होते. (नाव आठवत नाही!)
शाहरूख खान हा नायक असलेला संपूर्णपणे हाॅकीकेंद्रित चित्रपट म्हणजे 'चक दे इंडिया'. या चित्रपटात सर्व महिला भारतातील विविध राज्यांधून आलेल्या खेळाडू होत्या. सर्वांनी एकजुटीने खेळून आंतरराष्ट्रीय हाॅकीत अजिंक्यपद मिळवले, ती कथा अतिशय रोचक आहे. या विजयानंतर शाहरूख खानावरील देशद्रोहाचा आरोप तर पुसला जातोच, पण एका महिला खेळाडूच्या वाग्दत्त वराच्या अहंकारी स्वभावाला 'हम किसीसे कम नहीं' असा जोरदार प्रतिजवाब मिळतो.
अक्षयकुमारचा 'गोल्ड' हा कथापट हाॅकीविषयावरच होता.
धावपटू मिल्खा सिंगच्या जीवनावरील 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट एक अतिशय परिणामकारक चरित्रपट चित्रपट होता. विशेष म्हणजे तो मिल्खासिंगच्या जीवितकालातच बनला होता.
क्रिकेटच्या खेळाडूंचाया अंधविश्वास कसा असतो हे दाखवणारा क्रिकेटाधारित चित्रपट म्हणजे 'द जोया फॅक्टर'. त्याल एक खेळाडू खेळताना फक्त लाल रंगाचा रुमाल खिशात ठेवतो, तर दुसरा, जी अंडरवेअर घालून धावांचे पहिले शतक केले, तीच अंडरवेअर धुऊन धुऊन घालतो. काही खेळाडू शतक झाल्यावर दोन्ही हात आकाशाकडे करून देवाचे आभार मानतात, तर काहीजण जमिनीवर माथा टेकतात, तर काही नमाज ठोकतात. फुटबाॅलपटू मॅरिडोनाचा हात एकदा खेळताना फुटबाॅलला लागला, पण ते रेफरीच्या लक्षात आले नाही. त्या हाताला मॅरिडोनाने 'देवाचा हात' म्हणले.
राणी मुखर्जी ही 'हइशा' चित्रपटात पुरुषी कपडे घालून क्रिकेट खेळतेे, कारण तिच्या गावात मुलींना क्रिकेट खेळायची बंदी असते.
आमिरखानच्या लगान (Lagaan) या क्रिकेट ही मध्यवर्ती थीम असलेल्या चित्रपटात शेतीवर लादलेला लगान (कर) माफ करवून घेण्यासाठी, अडाणी गावकरी राज्यकर्त्या ब्रिटिशांच्या टीमशी क्रिकेट खेळतात आणि जिंकतात.
'सॉंड की ऑंख' चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या नेमबाज दाखवल्या आहेत.
बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि टेनिसमध्ये शून्य स्कोअर दाखवण्यासाठी 'लव्ह' शब्द वापरतात. हा अंडे अशा अर्थाच्या l'oeuf या फ्रेंच शब्दाचा अपभ्रंश असावा. कॅरममध्येही एकाच खेळाडूने सर्व सोंगट्या कॅरमच्या खिशांत घातल्या तरीही त्याला मराठीत 'लव्ह गेम दिला' म्हणतात. पण या संदर्भात वापरला जाणारा 'लव्ह गेम' हा अधिकृत शब्द नसावा. इंदूरमधील विभावरी संस्थेच्या सदस्यांनी बॅडमिंटनवर आधारित एक हिंदी कथा-चित्रपट काढला आहे, त्याचे नाव 'लव्ह ऑल' ठेवले आहे. समग्र भारतातून आलेल्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग भोपाळमध्ये झाले आहे, केके मेनन कोचच्या भूमिकेत आहेत, गीतलेखन सोनल शर्मांचे असून संगीत दिग्दर्शन सौरभचे आहे. सोनू निगमने गीते गायली आहेत. बॅडमिंटनवर बेतलेला हा बहुधा पहिलाच हिंदी चित्रपट असावा.
जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी
सामान्यत: भारताची टीम परदेशात, विशेषतः पाकिस्तानात खेळायला जाते तेव्हा देशाचे पंतप्रधान खेळाडूंना जिंकून या असा आशीर्वाद देतात. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की पाकिस्तानात गेल्यावर खेळाडू वृत्तीने खेळा, तर अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की 'दिल जीत के आओ'.
चक दे! इंडिया
चक देच्या प्रदर्शनानंतर १० वर्षांनी म्हणजे २०१७साली, त्या चित्रपटात काम केलेल्या मुली काय करत आहेत? उत्तर आहे :-
चक दे इंडियाच्या मुली दहा वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत, अडचणीत सल्लामसलत करतात.
- सागरिका घाटगे (प्रीती सबरवाल) : नसरुद्दीन शहाच्या 'इरादा' चित्रपटात दिसली होती. क्रिकेट खेळाडू जहीर खानबरोबर सगाई झाली; (लग्न?)
- चित्राश्री रावत (कोमल चौताला) : 'चक दे'नंतर अनेक चित्रपटांत आणि टीव्ही सीरियल्समध्ये दिसली. सध्या 'शंकर जयकिशन' नावाच्या सीरियलमध्ये केतन सिंहाच्या पत्नीची भूमिका करत आहे.
- शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) : 'बी.ए. पास' या चित्रपटानंतर नाटकांकडे वळली. महेश दत्तानीचा सिने प्ले 'द बिग फॅट सिटी'त दिसली होती.
- तान्या अबरोल (बलबीर कौल) : शिक्षण पूर्णकेल्यावर 'सी आयडी' आणि अशाच काही सीरियल्समध्ये काम केले. तिची एक वेब सीरियल येणार आहे. पंजाबी चित्रपटांत काम करते.
- शुभी मेहता (गुंजन लाखानी) : आमरस चित्रपटात काम केल्यानंतर Forever End a Day या लघु चित्रपटांत काम केले. आता गुडगाव (दिल्ली)त हिची कंपनी कॉर्पोरेट ट्रेनिंग देते.
- विद्या माळवदे (विद्या शर्मा) : संघाची गोलकीपर आणि कॅप्टन. सध्या योगाचे वर्ग घेते. देशात-परदेशांत कार्यशाळा भरवते.
- सीमा आझमी (राणी डिस्पोटा) : एनएसडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका नाटक मंडळीत दाखल झाली. तेते ती नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करते. सध्या 'इस प्यार को क्या नाम दूॅं-३'मध्ये विनोदी भूमिका करते आहे.
- मॅसोचॉन (मॉली झिमिक) : मणिपुरी खेळाडूची भूमिका करणारी ही मुलगी ईशान्य भारतात परतली.. तेथे ती एक तरुणांच्या एनजीओत काम करते आहे. तिला एक मुलगी झाली आहे.
- अनाहिता नायर : (आलिया बोस) : २०११ साली लग्न करून कायमची सिंगापूरला गेली. तिला एक मुलगी आहे, तिचे नाव आलिया ठेवले आहे.
- आर्या मेनन (गुल इकबाल) : विक्रम मोटवानी आणि अनुराग कश्यपच्या बेब सीरीजमध्ये ती क्रिएटिव्ह प्रोड्यूसर होती. आता तिची स्वतःची ॲड फिल्म्स काढणारी प्रॉडक्शन कंपनी आहे.
- सॅंडिया फुर्टाडो (नेत्रा रेड्डी) : मुंबईत वांद्ऱ्याला राहणाऱ्या सॅंडियाचे २०१६ साली लंडनमध्ये लग्न झाले. ती पी.आर. प्रोफेशनल आहे.
(अपूर्ण)