खेळ
खेळ ही एक शारीरिक व मानसिक कला आहे. खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो तसेच मानसिकताही प्रबळ बनते. दररोज किमान अर्धा ते एक तास कोणतातरी खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकासही घडतो. खेळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळे खेळ वेगवेगळ्या पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. खेळ हा माणसासाठी महत्त्वाचा असून त्यामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते.
इतिहास
प्राचीन काळी राजे, राजवाडे यांच्या काळात मनोरंजनासाठी विविध खेळांचे आयोजन केले जात असे. रेड्याच्या शर्यती, बैलांच्या झुंजी, त्या सोबत कुस्त्या , तलवारबाजी, दांडपट्टा, तिरंदाजी ... असे अनेक खेळ खेळले जात होते .
खेळाडूवृत्ती
व्यावसायिकीकरण
राजकारण
शारीरिक कला
तत्रज्ञान
प्रक्षणीय खेळ
अधिक माहिती
खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. शालेय मुलांसाठी अभ्यासाबरोबर खेळ ही महत्त्वाचा आहे म्हणून खेळाचा समावेश शालेय अभ्यासात केला जातो.तसेच मुलांमध्ये गोडी निर्माण होईल असे त्याचे स्वरूप ठेवले जाते. खेळ आरोग्यासाठी चांगले आहे .खेळ हा जीवनातील महत्त्वाचा घटक बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळ व स्पर्धा या साठी स्वतंत्रपणे नियमांची आखणी केलेली असते. स्पर्धेचे ठिकाण, खेळाडूंची संख्या, खेळांचे वेगवेगळे प्रकार त्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन, पंच , उत्तम प्रकारची क्रिडांगणे या सर्व गोष्टींचे नियोजन आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणा-या स्पर्धांचे नियम बदलत असतात. १९८२ मध्ये अथेन्स या ठिकाणी भरलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये काही बदल व नियम सुचविले गेले होते. यावेळी आयोजक व पंचांनी या बदललेल्या नियमांचे पालन केले.
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्रातील खेळ