Jump to content

खेरीगढ गाय

खेरीगढ गोवंश

खेरीगढ/खेरीगड हा शुद्ध भारतीय गोवंश असून उत्तरप्रदेश मधील प्रमुख गोवंश आहे. हा गोवंश खेरी जिल्हातील खिरीगड प्रांतात आढळतो. यामुळेच या गोवंशाला "खेरीगड", "खिरीगड" किंवा "केरीगड" असे नाव पडले. याच सोबतच पीलीभीत, शहाजहापूर, सीतापूर, जिल्हांमध्ये तसेच पऱ्हेर, मांजरा या विभागात, तरईच्या क्षेत्रात पण हा गोवंश आढळतो..[]

हा गोवंश खास करून कष्टाच्या कामासाठी, ओझे वाहून नेणे व तत्सम अवजड कामांसाठी वापरला जातो. हा गोवंश अतिशय परिश्रम करणारा गोवंश म्हणून प्रसिद्ध आहे. अशा कष्टाच्या कामांमुळे या गोवंशाचे बैल खुप खादाड असतात. या गोवंशाच्या गायी फारशा दुधारू नसतात.

शारीरिक रचना-
हा गोवंश प्रामुख्याने पांढऱ्या किंवा राखाडी रंगामध्ये आढळतो. चमकदार डोळे आणि लहान पण अरुंद कान असतात. बैलाचे वशिंड (खांदा) दिसायला मोठे, मजबूत व शक्तिशाली असते तर गायीचे वशिंड मध्यम आकाराचे आढळते. शिंगे पातळ आणि वरच्या बाजूस वळलेली असतात. या गोवंशाच्या गायींना सहसा लहान शिंगे असतात. गळ्याची पोळी (गलकंबल) ही लोंबकळणारी असते व ती हनुवटीच्या जवळून सुरू होते आणि खालपर्यंत जाते. या गोवंशाचे शेपूट लांब व झुपकेदार असते.

या गोवंशाच्या बैलाच्या शरीराची सरासरी उंची १३० ते १४० सेमी आणि वजन ४७५ ते ५२५ किलोग्रँम असते. तर गायीची उंची ही १२० ते १३० सेमी आणि वजन ३१० ते ४२० किलोग्रँम पर्यंत असते.

केरीगड बैल हे अवजड सामान घेऊन ताशी ५ ते ७ किमी वेगाने एका दिवसाला ५० ते ६० किमी पर्यंत सहज चालू शकतात.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (हिंदी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-02 रोजी पाहिले.