खेडभाळवणी
?खेडभाळवणी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पंढरपूर |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
खेडभाळवणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
खेडभाळवणीहे गावामध्येसोमेश्वराचे मंदिर आहे.खेडभाळवणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यायातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या अंदाजे १,८०० होती. हे गाव पंढरपूरच्या पश्चिमेस १५ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर आहे. हे गाव पंढरपूर – पुणे मार्गावर बाजीरावची विहीर या ठिकाणापासून ४ किमी अंतरावर आहे. येथील प्रवेशद्वारापासूनगावापर्यंत मुख्य रस्ता आहे. या गावात जाण्यासाठी पंढरपूर पासून बस वाहतुकीची सोय आहे.
या गावात सोमेश्वरचे जागृत देवस्थान आहे, दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते आसपासच्या खूप गावातून अनेक भक्त वर्षभर या गावात येतात. या गावात यल्लमा देवीचे मंदिर आहे दरवर्षी या देवीची यात्रा ३-४ दिवस साजरी केली जाते यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, ३-४ दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये खूप भक्त येतात.
या गावात अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. येथे शिवजयंती, जिजाऊ जयंती, भीम जयंती, गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र इ. सण साजरे केले जातात.
या गावात ग्रामपंचायत आहे. त्याद्वारे अनेक योजना या कार्यरत आहेत. गावमध्ये शुद्ध पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फिल्टरची सोय करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीत गावातील ३ वॉर्ड आहेत, त्यामध्ये प्रत्येकी ३ सदस्य असून एकूण ९ सदस्य असतात.
खेडभाळवणी गावातील ७०% लोक शेतीवर अवलंबून आहेत. या गावामध्ये उस पिक हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच या गावामध्ये छोटे-मोठे उद्योगधंदेही आहेत.
परंतु या गावात उसाची शेती मोठ्या प्रमानात केली कारण हे गाव भिमा(चंद्रभागा) नदीच्या काठी वसलेले आहे.