Jump to content

खुर्रम खान

खुर्रम खान ( २१ जून १९७१, मुल्तान, पाकिस्तान) हा संयुक्त अरब अमिरातीचा एक क्रिकेट खेळाडू आहे. डाव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा खुर्रम २००१ सालापासून संयुक्त अरब अमिराती संघाचा भाग आहे. सध्या तो यू.ए.ई. संघाचा कर्णधार आहे. त्याने आजवर १० एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये १ शतक व ३ अर्धशतकांसह ४२८ धावा काढल्या आहेत.

खुर्रम खानने २०१४ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा व २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये यू.ए.ई.चे नेतृत्व केले होते.

बाह्य दुवे