Jump to content

खुदा के लिए

खुदा के लिए (उर्दू : خُدا کے لئے, शब्दशः अर्थ : "देवासाठी") हा २००७ साली प्रदर्शित उर्दू भाषेतील एक पाकिस्तानी चित्रपट आहे. दिग्दर्शन आणि निर्मिती शोएब मन्सूर ह्यांचे असून अभिनयात शान, इमान अली, फवाद अफझल खान आणि हमीद शेख ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या असंक्षिप्त आवृत्तीत भारतीय अभिनेता नसीरुद्दीन शाह ह्यांचेसुद्धा दर्शन घडते. हा चित्रपट २००७ सालचा सर्वांत जास्त कमावणारा पाकिस्तानी चित्रपट ठरला.