खामोशी: द म्युझिकल
1996 film by Sanjay Leela Bhansali | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
Performer | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
खामोशी: द म्युझिकल हा १९९६ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या दिग्दर्शनात पदार्पण केले होते.[१][२][३] या चित्रपटात नाना पाटेकर, सलमान खान, मनीषा कोईराला आणि सीमा बिस्वास यांच्या भूमिका आहेत.[४][५] प्रकाशीत झाल्यावर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होता पण, चित्रपटाने गेल्या काही वर्षांमध्ये कल्ट फॉलोअर्स मिळवले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून त्याचा उल्लेख केला गेला.[६][७][८][९]
मनीषा कोईराला यांनी साकारलेल्या ॲनी, मूकबधिर जोडप्याची काळजी घेणारी मुलगी, तिचे समीक्षकांनी कौतुक केले, आणि ती तिच्या आजपर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक मानली जाते.[१०][११][१२] तिने तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा स्क्रीन पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सलग दुसरा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार यांचा समावेश आहे. खामोशीचे कथानक १९९६ च्या जर्मन चित्रपट बियॉन्ड सायलेन्स सारखेच आहे.[१३] [१४] खामोशी हा ९ ऑगस्ट १९९६ रोजी रिलीज झाला आणि बियॉन्ड सायलेन्स १९ डिसेंबर १९९६ रोजी प्रदर्शित झाला होता..
पात्र
- नाना पाटेकर - जोसेफ ब्रागांझा (ॲनीचे वडील)
- सलमान खान - राजंत "राज" कश्यप
- मनीषा कोईराला - एनी ब्रागांझा
- सीमा बिस्वास - फ्लेव्ही जे. ब्रागांझा (ॲनीची आई)
- हेलन - मारिया ब्रागांझा (जोसेफची आई)
- हिमानी शिवपुरी - नीलिमा कश्यप (राजची आई)
- रघुवीर यादव - विली
पुरस्कार
- ४२वे फिल्मफेर पुरस्कार :
जिंकले
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) - संजय लीला भन्साळी
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) - मनीषा कोईराला
- सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - कविता कृष्णमूर्ती "आज मैं उपर" साठी
- सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन – नितीन चंद्रकांत देसाई
- सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन - जितेंद्र चौधरी
नामांकन
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॉलिग्राम फिल्म्ड एंटरटेनमेंट
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - नाना पाटेकर
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मनीषा कोईराला
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - हेलन
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सीमा बिस्वास
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - जतिन-ललित
- सर्वोत्कृष्ट गीतकार - मजरूह सुलतानपुरी "आज मैं उपर" साठी
- सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - अलका याज्ञिक "बाहों के दरमियाँ" साठी
स्टार स्क्रीन अवॉर्ड्स:
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मनीषा कोईराला
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सीमा बिस्वास
- सर्वोत्कृष्ट गीतकार - मजरूह सुलतानपुरी "आज मैं उपर" साठी
- सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - कविता कृष्णमूर्ती "आज मैं उपर" साठी
संदर्भ
- ^ National Film Awards Function; India; Directorate of Film Festivals; India; Directorate of Advertising and Visual Publicity, eds. (2003). Rāshtrīya Filma Puraskāra. New Delhi: Directorate of Advertising & Visual Publicity, Ministry of Information & Broadcasting, Govt. of India for the Directorate of Film Festivals. p. 69. OCLC 54766419.
- ^ Dwyer, Rachel (2005). 100 Bollywood films. London: BFI. p. 116. ISBN 978-1-83871-397-3. OCLC 607760816.
- ^ Distribuidora, Petrobrás (2003). A Prefeitura do Rio e a Petrobras Distribuidora apresentam Festival do Rio 2003: de 25 de setembro a 9 de outubro = Rio de Janeiro Int'l Film Festival : September 25th to October 9th. Rio de Janeiro: Petrobras Distribuidora. p. 2010. OCLC 56428174.
- ^ Empty citation (सहाय्य)
- ^ "Once Upon a Cinema: When Sanjay Leela Bhansali and Salman Khan made a 'small' film". Firstpost. 10 August 2022.
- ^ BoxOffice India.com Archived 2012-10-10 at the Wayback Machine.
- ^ "Streaming Guide: Sanjay Leela Bhansali movies". The Indian Express. 3 November 2019. 23 March 2020 रोजी पाहिले.
- ^ "Khamoshi - Movie - Box Office India". Box Office India. 2022-07-03 रोजी पाहिले.
- ^ "Sanjay Leela Bhansali on Khamoshi: It couldn't have been made without Salman's support". Firstpost. 11 August 2022.
- ^ "Khamoshi - the Musical (1996)". Radio Times (इंग्रजी भाषेत). 21 March 2022 रोजी पाहिले.
- ^ Different bodies : essays on disability in film and television. Marja Mogk. Jefferson, North Carolina. 2013. p. 124. ISBN 978-0-7864-6535-4. OCLC 830367181.CS1 maint: others (link)
- ^ "Filmfare: Top 80 Iconic Performances (old article 2010)". tanqeed.com. 10 August 2012.
- ^ "European films being 'inspired by' Indian films rather than the other way round". The Hindu (इंग्रजी भाषेत). 18 October 2016. ISSN 0971-751X. 21 March 2022 रोजी पाहिले.
- ^ Gertz, Genie; Boudreault, Patrick (2016). The Sage deaf studies encyclopedia. Thousand Oaks, California: SAGE Publications. p. 411. ISBN 978-1-4833-4647-2. OCLC 936331814.