खाम नदी
खाम नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे.
सातारा पर्वतरांगा आणि लेकनंवारा टेकड्यांच्यामध्ये दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम होतो. आणि पैठणमध्ये गोदावरी नदीत नाथसागारात ती जाऊन मिळते. यादरम्यान सध्याच्या औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातून ७२ किमीच्या पट्ट्यातून ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना दिसते. औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे प्राचीन गाव वसलेले होते. पानचक्कीच्या जलाशयातुन बाहेर पडणारे पाणी खाम नदीत जाते. औरंगाबाद शहरातील बेगमपुरा, जयसिंगपुरा, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, औरंगपुरा, नागेश्वरवाडी, हर्सूल, छावणी, फाजालपुरा, कर्णपुरा, नवाबपुरा, बायजीपुरा हे उपविभाग खाम नदीच्या काठी आहेत.