Jump to content

खापरखेडा (जाफ्राबाद)

  ?खापरखेडा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ६.६७ चौ. किमी
जवळचे शहरजाफ्राबाद चिखली
विभागऔरंगाबाद
जिल्हाजालना
तालुका/केजाफ्राबाद
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
७१४ (२०११)
• १०७/किमी
८७९ /
भाषामराठी,
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 431206
• +०२४८२
• MH 21

खापरखेडा हे जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील एक गाव आहे. ते जाफ्राबाद या तालुक्याच्या गावापासून साधारणपणे १७ कि.मी. अंतरावर आहे.

लोकसंख्या

खापरखेडा येथे इ.स. २०११च्या जनगणनेनुसार १५८ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या ७१४ आहे, पैकी पुरुष ३८० तर स्त्रिया ३३४ आहेत. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ९० (मुलगे ५६ तर मुली ३४) असून ते प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १२.६१% आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ३० (४.२०%) असून त्यात १५ पुरूष व १५ स्त्रिया आहेत.[]

साक्षरता

  • एकूण साक्षर लोकसंख्या: 68.07%
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: 87.04%
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: 49.67%

ग्रामसंसद

  • ग्रामपंचायत सदस्य संख्या
खापरखेडा-03 गोपी-04
  • एकूण मतदार -567
  • एकूण पुरुष -299
  • एकूण स्त्री - 268

सरपंच सुरेखा शंकर गवळी

शैक्षणिक सुविधा

  • जिल्हा परिषद प्रशाला, खापरखेडा

आरोग्य केंद्र

गावात वैद्यकिय व आरोग्य केंद्रे उपलब्ध नाहीत. वरुड व भारज ठिकाणी येथील नागरिक वैद्यकिय सुविधा घेतात.

  • अंगणवाडी — 1

पिण्याचे पाणी

  1. सार्वजनिक विहिरी — 1
  2. खाजगी विहिरी —
  3. बोअर वेल — 0
  4. हातपंप — 0
  5. पाण्याची टाकी — 1
  6. नळ योजना —
  7. स्टॅंडपोस्ट — 4
  8. नळ कनेक्शन —
  9. वाटर फिल्टर — 1

नद्या व तलाव

गावातून दोन नद्या वाहतात. पाण्याचे पाणी व शेतीसाठीचे पाणी यांचे प्रमाण व उपलब्धता वाढली आहे.

स्वच्छता

खापरखेडा हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे. .

हगनदारी मुक्त

गावात जवळजवळ ६०% जणांनी शौचालये बांधलेली आहे.

संपर्क व दळणवळण

गावात दूरध्वनी उपलब्ध असून शेजारील गावात मोबाईल टॉवर ही उभारण्यात आले आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात ऑटोरिक्षा, टॅक्सी पिकअप व टाटा 407 उपलब्ध आहे.

बाजार

गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही. गावाशेजारील २ किमी अंतरावरील भारज येथे आठवड्याचा बाजार भरतो.

लोकजीवन

या गावात विविध जाती - धर्माचे लोक राहतात. त्यात प्रामुख्याने मराठा, बौद्ध, मांग इत्यादी समाज प्रामुख्याने आहेत.

कामगार

  • एकूण कामगार – 386 (पुरुष - 210 व स्त्रिया - 176)

धार्मिक स्थळे

गावात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यात दत्त मंदिर, हनुमान मंदिर, ही प्रमुख धर्मस्थळे आहेत. दत्त जयंतीला गावात जत्रा भरते सात दिवस सप्ताह आयोजन करून दत्त जयंतीला महाप्रसाद दिला जातो.

आरोग्य

गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहेत.

उत्पादन

खापरखेडा या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने): कापूस,सोयाबीन मिरची बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, तूर, मूग

संदर्भ

  1. ^ खापरखेडा - जनगणना २०११