Jump to content

खानुका

चानुकामध्ये वापरला जाणारा मेनोरा

हनुका (हिब्रू: חֲנֻכָּה) हा ज्यू धर्मातील एक सण आहे. जेरुसलेम येथील 'पवित्र मंदिरा'प्रती ज्यूधर्मीयांच्या श्रद्धेचे पुनःसमर्पण साजरा करणारा हा सण आहे. सलुसिद साम्राज्याविरुद्धचा मॅकेबियन्सचा उठाव, हा ह्या सणाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. दिव्यांचा उत्सव ह्या नावाने देखील ओळखला जाणारा हा सण हिब्रू दिनदर्शिकेच्या तिसऱ्या महिन्याच्या, 'किस्लेव'च्या २५ व्या दिवशी सुरू होतो व आठ दिवस चालतो. नोव्हेंबरचा उत्तरार्ध ते डिसेंबरचा उत्तरार्ध ह्यादरम्यान कधीतरी हा सण असतो. 'श्रद्धेचा उत्सव' अशीही ह्याची एक ओळख आहे. ह्या सणादरम्यान ९ दिवे असलेली मेनोरा नावाची एक विशिष्ट समई पेटवली जाते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत