खाजगी मालमत्ता
खाजगी मालमत्ता हा गैरसरकारी वैधानिक घटकांद्वारे (व्यक्ती अगर संस्था) संपत्तीची मालकी बाळगण्याचा वैधानिक अधिकार आहे. खाजगी मालमत्ता ही सरकारी घटकांची मालकी असलेल्या सार्वजनिक मालमत्ता व गैरसरकारी घटकांची मालकी असलेल्या सामायिक मालमत्ता ह्यांपासून वेगळी आहे. तसेच, ती वैयक्तिक वापर व विनियोगासाठी असलेल्या वैयक्तिक मालमत्ता ह्यापासूनसुद्धा वेगळी आहे.