Jump to content

खलनायक

खलनायक हे सहित्यामधील (पुस्तके, नाटके, चित्रपट इत्यादी) नकारात्मक पात्र आहे. खलनायक हा दुष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून कथानकामध्ये त्याची वाईट माणसाची भूमिका असते.

भारतीय हिंदी सिनेमांमध्ये प्राण, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, अजित इत्यादी अभिनेते खलनायकाच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होते. ऋषी कपूर, करण जोहर, गोविंदा, रितेश देशमुख, शाहरूख खान, सैफ अली खान यांनीही एकेकदा खलनायकाचीया भूमिका केली आहे.

एके काळी हिरोला ‘हिरो’ बनवण्यासाठी अत्यावश्यक असलेले आणि सिनेमाच्या यशात बरोबरीनं वाटा उचलणारे बरेच खलनायक बॉलिवूडमध्ये होत. त्यांची संख्या हळूहळू कमीकमी होत गेली. त्यानंतर हिंदी चित्रपटांत भूमिका करण्यासाठी टॉलिवूडमधून खलनायक आयात करण्याची पाळी आली.

हिंदी चित्रपटांतील खलनायकांची शब्दचित्रे रंगवणारे ‘खलनायक; हे मराठी पुस्तक लेखक आणि चित्रकार रघुवीर कूल यांनी लिहिले आहे. प्रकाशक - परम मित्र पब्लिकेशन्स.

काही हिंदी खलनायक

नाटक-चित्रपटांतील मराठी खलनायक

खलनायिका