खरेदी खत
एखादी जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण केल्याचा शासकीय पुरावा म्हणजेच खरेदी खत होय. जमिनीचा व्यवहार करताना जी किंमत ग्राहक आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली रक्कम अदा करून व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदी खत केले जाऊ शकते. जमीनीचे मालकी हक्क हस्तांतरीत करण्यासाठी खरेदी खत केले जाते.[१]
खरेदी खतला जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा म्हणून संबोधले जाते. या दस्तऐवजात जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रासाठी आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते. खरेदी खत झाल्यानंतर सदर माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद केली जाते[२].
कागदपत्रे
- सात बारा
- मुद्रांकशुल्क
- आठ अ
- मुद्रांक शुल्काची पावती
- प्रतिज्ञापत्र
- फेरफार
- दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो
- अकृषक ऑर्डरची प्रत
संदर्भ
- ^ Marathi, TV9 (2021-11-16). "खरेदीखत म्हणजे काय? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे..!". TV9 Marathi. 2023-03-23 रोजी पाहिले.
- ^ "जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का?".