Jump to content

खडीकोळवण

  ?खडीकोळवण

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३७ मी
मोठे शहररत्नागिरी
मोठे मेट्रोदेवरुख
जवळचे शहरसाखरपा
प्रांतकोकण
विभागसंगमेश्वर
जिल्हारत्‍नागिरी
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
३४४ (2011)
१,२०५ /
भाषाकुलवाडी,मराठी
संसदीय मतदारसंघरत्नागिरी
जिल्हा न्यायालयरत्नागिरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 415802
• +०२३५४
• MH 08

खडीकोळवण हे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिह्ल्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक माहीती

खडीकोळवण गाव हे सहयाद्रीच्या पायथ्याशी असलेले सन १९७० पुर्वी २००० लोकवस्तीचे गाव आहे. गावातील सर्वात जुने ग्रामदैवत देऊळ २०१३ पूर्वीचे आहे. गावाला लागूनच बामणोली, ओझरे, निनावे, निवे या गावांच्या प्रमुख सीमा आहेत. गावाच्या उत्तरेला मुक्काम मारल गावात शंकराचे मार्लेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी पर्यटक खडीकोळवण गावातून जाणारा जवळचा मार्ग म्हणून निवडतात. सह्याद्रीच्या अगदी पायथ्यशी बसलेले हे गाव मुंबईपासून ३५० किमी तसेच कोल्हापूर पासून १९० किमी. या गावाला कोकण रेल्वेने येण्यासाठी संगमेश्वर येथे उतरावे लागते व संगमेश्वर वरून देवरुख एसटीने साखरपा येते उतरून पुन्हा साखरपा येथून एसटीने खडीकोळवणात यावे लागते. कोल्हापूर येथून येताना कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी कलकदारा येथे थांबतात. १९८५पूर्वी कलकदारा यथे उतरून ग्रामस्थ गावात येण्यासाठी तासभर पायी प्रवास करीत होते. या गावाची मुख्य बाजारपेठ साखरपा ही असून गावापासून एसटीने एक तास अंतरावर आहे. सरकारी कार्यालये देवरुख येथे असल्याने ग्रामस्थांना सरकारी कामकाजासाठी जाण्यासाठी गावापासून दोन तासाचा प्रवास आहे. गावात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, ग्रामदेवता मंदिर, अत्रल देवता, ठोगल सान असून, गावाच्या वेशीवर अत्रल देवीचे लहानसे देऊळ आहे. गावाच्या चारीबाजूनी डोंगर असून विशाल डोंगरांच्या मध्यभागी खोऱ्यात गाव आहे. नाविरल्याचे पुर्वीचे भयाण जंगल आता जंगल तोडीमुळे पुर्वीसारखे घनदाट आरण्य राहिले नाही.