खडक्या लावा
खडक्या लावा किंवा खडकी लावा (इंग्लिश: Rock bush quail) हा भारतीय द्वीपकल्पातील लावा कुळातील एक पक्षी आहे.
हा पक्षी सहसा जंगल लाव्या बरोबर आढळून येतो. हनुवटी व गल्यावरचा डाग मातकट विटकरी, तांबडा. नराचा काळसर तपकिरी लावीच्या हनुवटीचा रंग पांढरा व गळ्यावर डाग असतो.
वितरण
हा पक्षी वऱ्हाडापासून दक्षिणेकडे दख्खनचे पठार ते तामिळनाडू पर्यंत आढळतो.
निवासस्थाने
दगड -गोट्याची झुडपी जंगले.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली