खडकोळी
?खडकोळी महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १.१०२६५ चौ. किमी |
जवळचे शहर | पालघर |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | २,१२६ (२०११) • १,९२८/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४०११०२ • +०२५२५ • एमएच४८ |
बोलीभाषा:आदिवासी कातकरी |
खडकोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर लालठाणे गावानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४७९ कुटुंबे राहतात. एकूण २१२६ लोकसंख्येपैकी १०५८ पुरुष तर १०६८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.६५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७६.५७ आहे तर स्त्री साक्षरता ५४.६२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३८५ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १८.११ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा सफाळेवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
गिरनोळी, सांगावे, कोकणेर, चहाडे, वासरे, तांदुळवाडी, रामबाग, माकुणसार, विळंगी, दांडा ही जवळपासची गावे आहेत.खडकोळी ग्रामपंचायतीमध्ये वासरे आणि खडकोळी गावे येतात.
संदर्भ
https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२.http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc