खडकी (दौंड)
?खडकी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दौंड |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
खडकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
शेती हा प्रमुख व्यवसाय असून पशू पालन आणि दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. इथे वेंकीस् कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.
प्रेक्षणीय स्थळे
गावातून पुणे - सोलापूर हायवे गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स उपलब्ध आहेत. जवळपास ३० पेक्षा जास्त हॉटेल असल्यामुळे एकप्रकारे चालकांसाठी गावाची ओळख ही तशीच आहे. तसेच गावातून दुसऱ्या द्रुतगती मार्गाचे काम चालू असून २०२३ मध्ये ते पूर्ण होईल. हा मार्ग फलटण पासून अहमदनगर पर्यंत असेल. ज्यामुळे गावाला मोठ्या प्रमाणात दळणवळणाची सोय उपलब्ध आहे.