Jump to content

खजूर

खजूर

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे खाण्यासाठी वापरतात.पिवळट तपकिरी रंगाचे हे बोरासारखे दिसणारे व थोडेसे लांबट फळ असते. एका फळात एकच बी असून तिच्या भोवतीच्या गरात ६० ते ७० टक्के साखर असते.खजूर लवकर आंबू लागतो,म्हणून खजुराची फळे कडक उन्हात सुकवतात. खजूर सुकवताना त्याचे ३५ टक्के वजन कमी होते.

मेसापोटेमियात सापडलेल्या ५००० वर्षापूर्वीच्या विटांवरील लिखाणात खजुराची लागवड करण्याविषयीच्या सूचना सापडतात, तर इजिप्तमधील स्मारकांवर खजुरांच्या झाडांची चित्रे कोरलेली आहेत.

बायबलमध्ये हे झाड व फळ यांचे गुण सांगणारे कित्येक उल्लेख आहेत. प्रेषित महंमद पैगंबर असे मानीत होते की, देवाने माणूस निर्माण केल्यावर उरलेल्या त्या खास मातीतून झाड निर्माण केले आहे.

खजुराचे मूळ स्थान मेसापोटेमिया अगर पार्शियाचे आखात असावे, असे मानतात. आज जगातल्या प्रमुख पिकांत त्याची गणना होते. सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, स्पेन, इटली, चीन व अमेरिका इतक्या ठिकाणी याचे पीक घेतात. खजुरात शरीरास पोषक अशी द्रव्ये भरपूर आहेत. ग्लुकोज व फ्रुक्टोज स्वरूपातील साखर त्यातून मिळते.खारीक खाल्ल्यास शरीराला विविध फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. संस्कृत; तसेच हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात.

खजुराचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत-

१)बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर( १२५ मिलीग्रॅम) आणि आवश्यकतेनुसार साखर ५०० मि.ली दुधामध्ये उकळून घ्या.यामुळे त्याचे पोषणमूल्य वाढते.

२)खजूर हे पौष्टिकतेमुळे टॉनिक मानले गेले आहे.

३)खजूर सहज पचत असल्याने शक्ती व उत्साह पुरवून तो रुग्णाची झीज लवकर भरून काढतो.

४)खजूर घालून उकळलेले दूध मुलांना व आजारी व्यक्तींना विशेषतः आचके येत असल्यास गुणकारी ठरते.

५)खजुरातील निकोटिनमुळे आतडय़ाच्या तक्रारींवर तो रामबाण ठरतो.

६)मेटचिनकाफ या रशियन शास्त्रज्ञाच्या मते खजुराचा भरपूर वापर केल्याने आतडय़ातील अपायकारक जंतूंची वाढ रोखली जाऊन आटोक्यात राहते.

७)खजूर हे सारक फळ आहे.

८)दारू व तत्सम पदार्थाची नशा खजुरामुळे उतरते.

९)दुबळय़ा हृदयासाठी खजूर चांगला आहे.

१०)लहान मुलांच्या मनगटाला खजूर कडे बनवून बांधावा. दात येताना त्याला तो चघळू द्यावा. यामुळे हिरडय़ा मजबूत होऊन दात ठिसूळ होत नाहीत.

११)खजूर निवडताना खबरदारी घ्यावी. कारण सालीच्या चिकटपणामुळे त्यावर धूळ व रोगजंतू चिकटतात. नीट केलेला चांगल्या प्रतीचा खजूर घेऊन नेहमी धुऊनच तो वापरावा.

१२)सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल.

१३)भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.

१४)खारीक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्याचा रामबाण उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होईल. दररोज रिकाम्या पोटी खारीक खावी. पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसऱ्या आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात. तिसऱ्या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून १२ व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन करावे. नपुंसकतेची समस्या दूर होईल.

१५)खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल.

खारीक

वाळलेल्या खजुरास खारीक म्हणतात.

गूळ

खजुराच्या चिकापासून खजुराचा गूळ तयार करण्यात येतो. यासाठी त्या झाडास चीर देण्यात येते व निघणारा चीक एका लोखंडी कढईत आटवून त्याचा गूळ केल्या जातो.[]

संदर्भ

  1. ^ लोकमत मीडिया प्रा. लि. "फूडमूड/खजुराचा गूळ". 2018-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-16 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य)