Jump to content

खंडू रांगणेकर

खंडेराव मोरेश्वर रांगणेकर (जन्म : २७ जून १९१७; - ११ ऑक्टोबर १९८४) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत. त्यांना दोन्ही हाताने क्षेत्ररक्षण व चेडूफेक करता येत होती आणि झेल घेता येत होते. रांगणेकर हे एक उत्तम बॅडमिंटनपटूही होते. त्यांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे आयुष्य महाराष्ट्राच्या ठाणे शहरात गेले. वयाच्या ४२ पर्यंत खंडू रांगणेकरांनी ४६०२ धावा जमवल्या. रांगणेकर आस्ट्रेलियात १९४७ च्या सुमारास तीन कसोटी सामने खेळले होते.

कारकीर्द

खंडू रांगणेकरांना मिळालेले सन्मान

  • ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्षपद
  • ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व बोर्ड ऑफ कंट्रोल फाॅर क्रिकेट इन इंडिया (BCCI)चे उपाध्यक्ष होते.
  • ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रांगणेकरांच्या नावाचा हाॅल आहे. तेथे बॅडमिंटन खेळायची सोय आहे.
  • ठाण्याच्या सुधाकर प्रधान मार्गावर खंडू रांगणेकर यांच्या नावाचे सभागृह आहे. सामाजिक समारंभांना तो हाॅल भाड्याने मिळू शकतो.